Sourav Ganguly Corona Positive esakal
क्रीडा

Ranji Trophy ठरल्याप्रमाणे; कोरोनाच्या धास्तीत गांगुलींचा सकारात्मक स्ट्रोक

सुशांत जाधव

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी देशांतर्गत रणजी ट्रॉफी स्पर्धा (Ranji Trophy) ठरल्याप्रमाणे होणार असल्याचे म्हटले आहे. देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना (Covid-19) रणजी ट्रॉफी स्पर्धा संकटात सापडणार अशी चर्चा रंगली होती. या चर्चेला गांगुलींनी पूर्णविराम दिलाय. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुन्हा एकदा खेळावर संकटाचे ढग दाटून आले आहे. विशेष करुन युरोपात सुरु असलेल्या अनेक स्पर्धेत स्टाफ सदस्य आणि खेळाडू कोरोनाच्या जाळ्यात अडकल्याच्या बातम्या येत आहेत.

देशातीलही परिस्थिती काही वेगळी नाही. दिवसागणिक कोरोना बाधितांचा आकडा वाढताना दिसतोय. या परिस्थितीत देशांतर्गत क्रिकेटला पुन्हा फटका बसणार असे वाटत होते. पण गांगुलींनी रणजी स्पर्धा ठरलेल्या वेळापत्रकानुसार होणार हे स्पष्ट केले आहे.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, सौरव गांगुली म्हणाले की, रणजी ट्रॉफी स्पर्धा ठरलेल्या वेळापत्रकानुसार होईल.13 जानेवारी ते 20 मार्च दरम्यान या स्पर्धेतील सामने खेळवणे नियोजित आहे. कोलकाता तटस्थ ग्रुप स्टेज मॅचसह नॉकआउट सामन्यांची मेजवाणी करणार आहे. गांगुली यांच्या वक्तव्यापूर्वी बंगाल क्रिकेट असोसिएशनने (CAB) काही खेळाडूंचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले होते. परिणामी स्थानिक स्पर्धा स्थगित कराव्या लागत आहेत, असे निवदेन त्यांनी जारी केले होते.

दरम्यान मुंबई संघाचा सदस्य असलेला अष्टपैलू खेळाडू शिवम दुबेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्याशिवाय टीमचे व्हिडिओ विश्लेषक यांनाही कोरोनाची लांगण झाली आहे. दुबेच्या जागी मुंबईने साईराज पाटील याची 20 सदस्यीय रणजी संघात निवड केलीये. बंगाल रणजी टीममध्ये सात जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे बंगालच्या संघाला मोठा दणका बसला आहे. एका बाजूला खेळाडू आणि स्टाफ सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले असताना गांगुलींनी वेळापत्रकात कोणताही बदल होणार नाही असे म्हटले आहे. कोरोनाच्या धास्तीमुळे अनेक ठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण होत असताना बीसीसीआय याबाबतीत खेळाडूंच्या बाजूनं सकारात्मक विचार करताना दिसते. सध्याच्या घडीला कोरोनामुळे स्पर्धा स्थगित करण्याच्या मूडमध्ये ते अजिबात दिसत नाहीत, हेच गांगुलींच्या वक्तव्यातून स्पष्ट होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyadevi Holkar Scheme: अहिल्यानगरातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! १.१६ लाख लाभार्थ्यांची कर्जमाफी यादी जाहीर, १,०९८ कोटींचा लाभ

IND vs ZIM: "हा पोरगा कोणालाच संघात परत येऊ देणार नाही!", वैभव सूर्यवंशीच्या खेळीनं भारतीय दिग्गजाचा सॅमसनला इशारा?

Latest Marathi News Live Update : नीट पेपर फुटी रोखण्यासाठी मोदी सरकार आज संसदेत मांडणार नवीन कठोर कायदा

Hyderabad-Jaipur Express Theft: हैदराबाद-जयपूर एक्स्प्रेसमध्ये बॅग चोरणारा आरोपी जेरबंद

Petrol-Diesel-CNG Price: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कच्चे तेल स्वस्त! देशात पेट्रोल-डिझेल-CNG चे नवे दर जाहीर; पाहा ताजा भाव

SCROLL FOR NEXT