Virat-Kohli-Puzzled 
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 WC: पाकिस्तानविरूद्ध विराट 'इथे' चुकला- जहीर खान

IND vs PAK: भारताचा पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात मोठा पराभव

विराज भागवत

IND vs PAK: भारताचा पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात मोठा पराभव

India vs Pakistan, T20 World Cup 2021: विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला. विराटने कर्णधारपदाला साजेशी खेळी करत संघाला १५१ धावांपर्यंत मजल मारून दिली. पण पाकिस्तानच्या सलामीवीरांनीच पाकला विजय मिळवून दिला. मोहम्मद रिजवान आणि बाबर आझम या दोघांनीही प्रत्येकी नाबाद अर्धशतकी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. पाकिस्तानविरूद्ध विराट कोहली नक्की कुठे चुकला? याबद्दल माजी वेगवान गोलंदाज जहीर खान याने आपलं मत व्यक्त केलं.

"खेळ सुरू होण्याआधी तुम्ही काहीही प्लॅन्स तयार करू शकता पण एकदा खेळ सुरू झाला की तुम्हाला शक्य तितक्या गोष्टींमध्येच पुढील योजनांची अमलबजावणी करावी लागते. काही वेळा खेळ सुरू झाल्यावर तुम्ही प्लॅन केलेल्या गोष्टी बदलतात. पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात विराट कोहलीने बुमराहचा योग्य वापर केला नाही. त्यामुळे जेव्हा सामना संपला त्यावेळी बुमराहची कामगिरी फारशी चांगली झाल्याचे दिसले नाही. बुमराहसारख्या खेळाडूला पहिले षटक देणं गरजेचं होतं. त्याला तिसऱ्या षटकापर्यंत थांबवून ठेवण्यात काहीच अर्थ नव्हता", असं जहीर म्हणाला.

Zaheer Khan

"बुमराह हा भारतीय संघाचा हुकूमी एक्का आहे. त्यामुळे अशा गोलंदाजाला कायम पहिली संधी मिळायला हवी. पाकिस्तानच्या संघाच्या पहिल्या काही विकेट्स लवकरात लवकर काढणं गरजेचं होतं. पण विराटने बुमराहला तिसऱ्या षटकापर्यंत राखून ठेवलं. त्याला पहिलं षटक दिलं असतं तर कदाचित सामन्यात थोडीशी रंगत आली असती", असं जहीरने स्पष्ट केलं.

IND-vs-PAK-Babar-Azam

"अशा छोट्या गोष्टी सामन्यात दिसून येत नाहीत पण खूप फरक पाडतात. काही वेळा तुम्ही स्वत: ठरवलेल्या प्लॅन्सनुसार खेळ सुरू ठेवता. मला विश्वास आहे की भारताचा डाव संपल्यानंतर गोलंदाजीच्या प्लॅनवर नक्कीच चर्चा झाली असेल. पण त्या चर्चेअंती बुमराहला पहिलं षटक द्यावं असं ठरलं नाही, त्यामुळे विराटने तसं केलं. कारण कोणालाही अशी कल्पना नव्हती की दोन सलामीवीर दीडशतकी आव्हान सहज पेलतील", असं जहीर खानने नमूद केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

H-1B Visa Fee Hike : अमेरिकेने एच-१ बी व्हिसा केला महाग, भारतीयांवर होणार थेट परिणाम, नेमंक काय घडलं?

SSC Paper Leak News: खळबळ! दहावी पूर्व परीक्षेचा पेपर फुटल्याची चर्चा?, समाज विज्ञानचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल

भारतीय क्रीडा विश्वावर शोककळा! ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या खेळाडूचे निधन

Latest Marathi News Live Update : जालन्यात ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या काळात आधार, पॅन आणि मतदान कार्ड कचऱ्यात

Nitin Gadkari: गरिबांचे जीवन सुसह्य करण्याचा संकल्प: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी; पश्चिम, उत्तर नागपूरमधील मतदारांशी साधला संवाद!

SCROLL FOR NEXT