Devon Conway Thumb Injury IPL CSK Marathi News  SAKAL
Cricket

IPL आधी MS धोनी टेन्शनमध्ये! चेन्नई सुपर किंग्जचा हुकमी एक्का अर्ध्या हंगामातून बाहेर?

आयपीएलचा नवा हंगाम सुरू होण्यासाठी फारच कमी दिवस राहिले आहे. आणि त्याआधी गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का बसला आहे.

Kiran Mahanavar

Devon Conway Thumb Injury : आयपीएलचा नवा हंगाम सुरू होण्यासाठी फारच कमी दिवस राहिले आहे. आणि त्याआधी गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार सलामीवीर डेव्हन कॉनवे दुखापतीमुळे मे पर्यंत आयपीएल 2024 मधून बाहेर जाऊ शकतो. खरंतर, ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच झालेल्या टी-20 मालिकेदरम्यान कॉनवेच्या अंगठ्याला दुखापत झाली होती.

या दुखापतीमुळे तो कांगारूंविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिला सामनाही खेळू शकला नाही. पण आता न्यूझीलंड क्रिकेटने त्याच्या दुखापतीबाबत अपडेट देताना सांगितले आहे की, कॉनवेची अंगठ्याची शस्त्रक्रिया होणार असून त्यामुळे तो 8 आठवडे मैदानाबाहेर राहणार आहे.

जो चेन्नई सुपर किंग्ज संघ आणि चाहत्यांसाठी मोठा धक्का आहे. ड्वेन कॉनवे हा चेन्नई सुपर किंग्जचा महत्त्वाचा फलंदाज मानला जातो. कॉनवेचा सध्याचा फॉर्मही चांगला आहे, त्यामुळे तो सुरुवातीच्या सामन्यांमधून बाहेर जाणे सीएसकेसाठी मोठा धक्का आहे. चेन्नई सुपर किंग्जचे सराव शिबिरही गेल्या आठवड्यात सुरू झाले आहे. आता हळूहळू सीएसकेचे उर्वरित खेळाडूही या सराव शिबिरात सहभागी होणार आहेत.

ड्वेन कॉनवेसाठी आयपीएल 2023 खूपच चांगली गेली होती. गेल्या मोसमात ड्वेन कॉनवेने सीएसकेला चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. आयपीएल 2023 मध्ये कॉनवेने 51.69 च्या सरासरीने 672 धावा केल्या. या काळात त्याने 6 अर्धशतके झळकावली. 22 मार्चपासून आयपीएल 2024 सुरू होत आहे. चेन्नई सुपर किंग्ज त्यांच्या घरच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध स्पर्धेतील सलामीचा सामना खेळणार आहे.

चेन्नई सुपर किंग्ज संघ आयपीएल 2024 : एमएस धोनी (कर्णधार), मोईन अली, दीपक चहर, डेव्हन कॉनवे, तुषार देशपांडे, शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, राजवर्धन हंगरकर, रवींद्र जडेजा, अजय मंडल, मुकेश चौधरी, मथिशा पाथीराना, शेखर शेख, ए. रशीद, मिचेल सँटनर, सिमरजीत सिंग, निशांत सिंधू, प्रशांत सोळंकी, महेश थेक्षाना, रचिन रवींद्र, शार्दुल ठाकूर, डॅरिल मिशेल, समीर रिझवी, मुस्तफिजुर रहमान.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plane lands on moving car Video : भयानक दुर्घटना!, विमान थेट भरस्त्यावरील धावत्या कारवरच झालं लँड अन्..

Jowar Shengole Recipe: हिवाळ्यात बनवा पारंपरिक पद्धतीने गरमागरम ज्वारीच्या पिठाचे शेंगोळे!

Latest Marathi News Live Update : नावाला पार्थ, अजितदादांचा स्वार्थ - दमानिया

Kannad Police Raid : कन्नडमध्ये मांजा विक्रेत्यावर पोलिसांचा छापा; एक ताब्यात; नायलॉन मांजा जप्त!

Paithan Robbery : दावरवाडी येथे शेतात जाणाऱ्या महिलेस भरदुपारी चोरट्यांनी लुटले; पाचोड पोलिसात गुन्हा दाखल!

SCROLL FOR NEXT