Ben Stokes ruled out of 5th Test due to shoulder injury esakal
Cricket

IND vs ENG 5th Test : मी नसलो तरी, संघ टीम इंडियाला पुरून उरेल! Ben Stokes चा शुभमन गिल अँड कंपनीला इशारा, Video Viral

Ben Stokes Ruled Out of 5th Test Against India: पाचव्या कसोटीच्या पूर्वसंध्येला इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. खांद्याच्या दुखापतीमुळे कर्णधार बेन स्टोक्स याने माघार घेतली आहे. तरीही त्याने इंग्लंडचा संघ सामन्यासह मालिका जिंकेल,असा दावा केला आहे.

Swadesh Ghanekar

  • भारत-इंग्लंड पाचवी कसोटी ३१ जुलैपासून दी ओव्हल येथे होणार

  • इंग्लंडने जाहीर केलेल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये चार बदल

  • कर्णधार बेन स्टोक्ससह जोफ्रा आर्चरही प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर

IND vs ENG 5th Test Oval Ben Stokes sends warning to Team India : भारतीय संघाचा पाचव्या कसोटीत विजयाचा अडथळ्याचा मार्ग जरा मोकळा झाला आहे. कर्णधार बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर यांना पाचव्या कसोटीसाठीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळालेली नाही. स्टोक्सला खांद्याच्या दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. असे असले तरी स्टोक्सने पूर्वसंध्येला टीम इंडियाची खोड काढली आहे आणि जिंकणार तर आम्हीच असा दावा केला आहे. इंग्लंडचा संघ मालिकेत २-१ असा आघाडीवर आहे आणि भारताला मालिका वाचवण्यासाठी पाचवी कसोटी जिंकणे महत्त्वाचे आहे.

लीड्स कसोटीतील पराभवानंतर टीम इंडियाने पुनरागमन करताना एडबॅस्टन कसोटी जिंकली. लॉर्ड्सवर त्यांचा विजय थोडक्यात हुकला, तर मँचेस्टरवर जिद्दीच्या जोरावर पराभव टाळण्यात भारतीयांना यश आले. अशात इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे आणि पाचवी कसोटी जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्याची संधीच टीम इंडियाला मिळाली आहे.

मालिकेतील शेवटची कसोटी खेळता येत नसल्याने स्टोक्सने निराशा व्यक्त केली आहे, परंतु त्याचवेळी दुखापतीबाबत धोका पत्करू शकत नसल्याचेही त्याने म्हटले. वैद्यकीय टीमच्या सल्ल्यानंतरच त्याने माघार घेण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या गैरहजेरीत उप कर्णधार ओली पोप संघाचे नेतृत्व करणार आहे. ३४ वर्षीय स्टोक्सने या मालिकेत ४३.४२ च्या सरासरीने ३०४ धावा केल्या आणि १७ विकेट्सही घेतल्या आहेत.

स्टोक्सम म्हणाला, निराश तर नक्कीच आहे. मला होणाऱ्या वेदना मी शब्दात सांगू शकत नाही. मी सकाळी सराव सत्रात आलो, संघाला फलंदाजीत तरी योगदान देऊ शकेन का, याची चाचपणी केली. पण, वैद्यकीय टीमशी चर्चा केल्यानंतर मी माघार घेतली. मला धोका पत्करायचा नव्हता. माझ्याजागी दुसरं कुणी असतं तरी मी हेच म्हणालो असतो.

स्टोक्ससह, जोफ्रा आर्चर, लिएम डॉसन व ब्रेसन कार्स यांनाही या कसोटीत खेळता येणार नाही. जेकब बेथेल, गस एटकिन्सन व जेमी ओव्हरटन आणि जोश टंग हे त्यांच्या जागी खेळतील. असे असले तरी स्टोक्सने हा संघ दी ओव्हल कसोटी जिंकेल असा विश्वास व्यक्त केला. तो म्हणाले, एका माणसामुळे तुम्ही सामना जिंकू किंवा हरू शकत नाही. मी जरी खेळत नसलो तरी आमचा संघ पाचवी कसोटी जिंकून मालिका खिशात घालेल. आमच्या संघात तेवढी क्षमता असलेले प्रतिभावान खेळाडू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident: पेविंग ब्लॉकच्या खड्ड्यामुळे ज्येष्ठ नागरिकाचा जीव गेला; पुण्यातल्या 'या' मृत्यूला कोण जबाबदार?

Anil Ambani: अनिल अंबानींची ईडी करणार चौकशी; 17 हजार कोटींचा कर्ज घोटाळा, तपासात काय आढळले?

Tarot Horoscope August 2025: राज राजेश्वर योगामुळे मेष, मिथुनसह ४ राशींना लाभ; वाचा ऑगस्टचे टॅरो राशीभविष्य

Solapur News:'शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी सावंतांचा संपर्कप्रमुख पदाचा राजीनामा'; निवडणुकीच्या तोंडावर गटबाजी

August Long Weekend: ऑगस्टमध्ये लॉंग वीकेंड प्लॅनिंग करताय? मग 'या' तारखा नक्की लक्षात ठेवा, आनंद दुपटीने वाढेल!

SCROLL FOR NEXT