India vs Pakistan T20 World Cup 2024 Ticket Price news in marathi 
Cricket

T20 World Cup : तिकिटांच्या किमती भिडल्या गगनाला! Ind vs Pak वर्ल्डकप सामना पाहायचाय... मोजा इतके कोटी

जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात हे दोन संघ आमनेसामने आले तरी चाहते पैसे खर्च करून सामना पाहण्यासाठी जातात आता....

Kiran Mahanavar

India vs Pakistan T20 World Cup 2024 Ticket Price : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. दोन्ही संघांमध्ये कोणतीही द्विपक्षीय मालिका नाही. त्यामुळे दोन्ही संघ केवळ आयसीसी आणि आशियाई क्रिकेट परिषदेच्या स्पर्धांमध्येच आमनेसामने येतात.

त्यामुळे जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात हे दोन संघ आमनेसामने आले तरी चाहते पैसे खर्च करून सामना पाहण्यासाठी जातात. आता आगामी टी-20 वर्ल्ड कपमध्ये दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. 9 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये दोन्ही संघ आमनेसामने येतील आणि मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिकिटांच्या किमती आधीच पुन्हा विक्रीच्या बाजारात गगनाला भिडल्या आहेत.

अधिकृत विक्रीमध्ये तिकीटाची सर्वात कमी किंमत सहा डॉलर्स म्हणजे 497 रुपये आहे. त्याच वेळी या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी प्रीमियम सीटची किंमत 400 डॉलर्स म्हणजेच 33,148 रुपये आहे.

पण StubHub आणि SeatGeek सारख्या प्लॅटफॉर्मवर तिकिटांच्या किमती खूप जास्त आहेत. अधिकृत विक्रीवर ज्या तिकिटाची किंमत $400 होती, ती या साइट्सवर $40,000 इतकी आहे, म्हणजे अंदाजे 33 लाख रुपये.

यूएसए टुडे मधील एका अहवालानुसार, सुपर बाउल 58 तिकिटांना दुय्यम बाजारात कमाल $9,000 मिळू शकतात, तर NBA फायनलसाठी कोर्टसाइड सीट्स कमाल $24,000 मिळवू शकतात.

SeatGeek प्लॅटफॉर्मवर किमती गगनाला भिडल्या आहेत. टी-20 वर्ल्ज कप 2024 मधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी या साइटवरील सर्वात महाग तिकिटाची किंमत $175,000 म्हणजेच अंदाजे 1.4 कोटी रुपये आहे. प्लॅटफॉर्म शुल्क आणि अतिरिक्त शुल्क यामध्ये जोडल्यास ही आकडेवारी सुमारे 1.86 कोटी रुपयांपर्यंत जात आहे.

India vs Pakistan T20 World Cup 2024 Ticket Price

टी-20 वर्ल्ड कप 2024 चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या या स्पर्धेत भारतीय संघाला पाकिस्तानसोबत अ गटात ठेवण्यात आले आहे. या गटात हे दोन मोठे संघ आहेत.

याशिवाय आयर्लंड, कॅनडा आणि अमेरिका या दोन संघांविरुद्धचा कोणताही सामना जिंकणे कठीण होईल. आगामी टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताचे नेतृत्व रोहित शर्माकडे तर पाकिस्तानचे नेतृत्व शाहीन आफ्रिदीकडे असणार आहे.

हे दोन्ही संघ आठव्यांदा टी-20 वर्ल्ड कपमध्ये आमनेसामने येणार आहेत. याआधी भारताचा सात वेळा पाकिस्तानशी सामना झाला आहे. ज्यामध्ये टीम इंडियाने सहा वेळा सामना जिंकला आहे, तर पाकिस्तान संघ एकदा जिंकण्यात यशस्वी ठरला आहे.

भारतीय संघ केवळ एकदाच पाकिस्तानकडून पराभूत झाला आहे. हा सामना 2021 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळला गेला होता, जो पाकिस्तानने 10 विकेटने जिंकला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

Thane News: काँग्रेसच्या माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश; पदाधिकाऱ्यांच्या पक्षत्यागावर संतोष केणेंचा माजी आमदारांवर थेट आरोप, म्हणाले...

गिरीश ओक-निवेदिता सराफची जोडी पुन्हा पहायला मिळणार, 'बिन लग्नाची गोष्ट'सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, प्रिया बापट आणि उमेश कामतची गोड केमिस्ट्री

Maharashtra Latest News Update: राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांना टोल नाही, NHAI चे अधिकृत स्पष्टीकरण

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

SCROLL FOR NEXT