MS Dhoni Viral Video Sakal
Cricket

MS Dhoni: 'बोले जो कोयल...' धोनीच्या गोड आवाजातलं गाणं ऐकलं का ? चाहते म्हणत आहेत, थाला फॉर रिझन!

MS Dhoni Bole jo Koyal Video: एमएस धोनीचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून यात खुद्द तोच 'बोले जो कोयल...' हे गाणे गुणगुणत आहे.

Pranali Kodre

MS Dhoni Viral Video: चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार एमएस धोनी सध्या त्याच्या तुफानी फलंदाजीमुळे तर चर्चेत आहेच, पण त्याचबरोबर त्याचा एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ एका इ-बाईकच्या जाहीरातीचा आहे. या जाहीरातीमध्ये धोनी इ-बाईक चालवत असून यावेळी तो 'बोले जो कोयल', हे गाणे गुणगुणत आहे. यावेळी तो पक्षी या इ-बाईकबद्दल माहिती देत असून शेवट म्हणतात, 'माही भाई या इ-बाईकवर काय मस्त दिसतो. थाला फॉर अ रिझन.'

दरम्यान, या व्हिडिओची चर्चा होत आहे कारण या जाहीरातीमध्ये धोनीवर होणाऱ्या 'बोले जो कोयल' आणि 'थाला फॉर अ रिझन' या मीमचा वापर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. चाहत्यांनीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

खरंतर गेल्या अनेक दिवसांपासून बऱ्याचदा धोनीला ट्रोल करण्यासाठी बोले जो कोयल हे मीम शेअर केलं जात होतं. त्याचबरोबर या गाण्यावर काही मीमचे व्हिडिओही व्हायरल झाले होते.

तसेच 'थाला फॉर अ रिझन' हे वाक्यही काही महिन्यांपासून बऱ्याच प्रमाणात ट्रेंडिंगमध्ये होतं. ज्या गोष्टींची गोळाबेरीज 7 आकड्यात होते, त्याला थाला फॉर अ रिझन हे वाक्य वापरलं जात होतं.

धोनीचा जर्सी क्रमांक 7 आहे. सुरुवातीला हा ट्रेंडही धोनीला ट्रोल करण्यासाठी सुरू झाला होता, असं म्हटलं जातं. परंतु, नंतर धोनीशी निगडीत गोष्टींसाठीही अनेकदा हे वाक्य वापरलं गेलं.

दरम्यान धोनी सध्या आयपीएल 2024 स्पर्धेत खेळत आहे. त्याने या आयपीएल हंगामाला सुरुवात होण्यापूर्वीच चेन्नई सुपर किंग्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला असून ही जबाबदारी युवा ऋतुराज गायकवाडकडे सोपवण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! सततच्या पावसामुळे नुकसान झाले तरच शेतकऱ्यांना मिळणार भरपाई; सततचा पाऊस म्हणजे काय?, सोलापुरातील ‘या’ ३ तालुक्यातच अतिवृष्टी झाल्याची नोंद

दैव की कर्म?

आजचे राशिभविष्य - 24 ऑगस्ट 2025

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 24 ऑगस्ट 2025

टेबल टेनिसमध्ये भारताला ऑलिंपिक पदकाची आशा

SCROLL FOR NEXT