Mumbai vs Baroda Ranji Trophy sakal
Cricket

मुंबई उपांत्य फेरीच्या दिशेने...! मात्र कर्णधार रहाणेचा खराब फॉर्म कायम; हार्दिकची शतकी खेळी

सर्वाधिक ४१ वेळा विजेतेपदाला गवसणी घालणारा मुंबईचा क्रिकेट संघ यंदाच्या रणजी करंडकात उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे.

Kiran Mahanavar

मुंबई, ता. २६ : सर्वाधिक ४१ वेळा विजेतेपदाला गवसणी घालणारा मुंबईचा क्रिकेट संघ यंदाच्या रणजी करंडकात उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. हार्दिक तामोरे (११४ धावा), पृथ्वी शॉ (८७ धावा), शम्स मुलानी (५४ धावा) यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर मुंबईने दुसऱ्या डावात ९ बाद ३७९ धावा केल्या असून आता मुंबईचा संघ ४१५ धावांनी पुढे आहे. बडोद्याचा आणखी एक डाव बाकी असला तरी आज (ता. २७) उपांत्यपूर्व लढतीचा अखेरचा दिवस असणार आहे.

मुंबईने १ बाद २१ या धावसंख्येवरून सोमवारी पुढे खेळायला सुरुवात केली. भार्गव भट्टने मोहित अवस्थीला ४ धावांवर बाद करून मुंबईचा दुसरा फलंदाज पॅव्हेलियनमध्ये पाठवला. पहिल्या डावात द्विशतकी खेळी साकारणाऱ्या मुशीर खानला या डावात मोठी खेळी करता आली नाही. भार्गव भट्टच्या गोलंदाजीवर मुशीर खान ३३ धावांवर पायचीत बाद झाला. हार्दिक तामोरे व पृथ्वी शॉ या जोडीने १२४ धावांची आक्रमक भागीदारी रचली. पृथ्वी शॉ याने ९३ चेंडूंमध्ये १० चौकार व २ षटकारांच्या साह्याने ८७ धावांची खेळी साकारली. भार्गव भट्टच्याच गोलंदाजीवर तो बाद झाला.

हार्दिक तामोरे याने २३३ चेंडूंमध्ये १० चौकारांसह ११४ धावांची खेळी साकारताना महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. तो बाद झाल्यानंतर सूर्यांश शेडगे (१० धावा) व शार्दुल ठाकूर (१० धावा) यांच्याकडून निराशा झाली.

अजिंक्य रहाणेचा सुमार फॉर्म कायम

मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणे याचा सुमार फॉर्म याही लढतीत कायम राहिला. भारताच्या कसोटी संघातून बाहेर फेकला गेलेल्या अजिंक्य रहाणेला यंदाच्या रणजी मोसमात सूर गवसला नाही. मुंबईच्या या खेळाडूने या रणजी मोसमात ०, ०, १६, ८, ९, १, ५६ नाबाद, २२, ३, ० अशा धावा केलेल्या आहेत. छत्तीसगडविरुद्ध त्याने एकमेव अर्धशतकी खेळी केली आहे. तीन वेळा तो शून्यावर बाद झाला आहे.

तळाच्या फलंदाजांची झुंज

शम्स मुलानी याने तळाच्या फलंदाजांसोबत खेळपट्टीवर ठाण मांडत मुंबईसाठी मोलाचे प्रदर्शन केले. शम्स मुलानी याने ८ चौकार व १ षटकारासह ५४ धावांची खेळी केली. तुषार देशपांडे (नाबाद २३ धावा) व तनुष कोटियन (नाबाद ३२ धावा) यांनी अखेरच्या विकेटसाठी नाबाद ४२ धावांची भागीदारी करताना बडोद्याच्या गोलंदाजांचा झुंजवले. भार्गव भट्टने १४२ धावा देत सात फलंदाजांना बाद केले.

संक्षिप्त धावफलक ः मुंबई- पहिला डाव ३८४ धावा. बडोदा- पहिला डाव ३४८ धावा. मुंबई- दुसरा डाव ९ बाद ३७९ धावा (हार्दिक तामोरे ११४ - २३३ चेंडू, १० चौकार, मुशीर खान ३३, पृथ्वी शॉ ८७, शम्स मुलानी ५४, तनुष कोटियन नाबाद ३२, तुषार देशपांडे नाबाद २३, भार्गव भट ७/१४२).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

पानिपताच्या लढाईनंतर या पेशव्याचं प्रेत विजयचिन्ह म्हणून अफगाणी सैनिक नेणार होते ! इतिहासातील अवघड प्रसंग

Photos : अंतराळातून दिसले पृथ्वीवर कोसळणाऱ्या प्रकाशस्तंभाचे अद्भुत दृश्य; शास्त्रज्ञही थक्क, पाहा आश्चर्यकारक फोटो..

Solapur News: 'मंगळवार, बुधवारी शाळा राहणार बंद'; वाढीव टप्पा अनुदानासाठी शिक्षक संघाचा निर्णय, नंतर मुंबईत आंदोलन

SCROLL FOR NEXT