Ranji Trophy 2024 ESAKAL
Cricket

Ranji Trophy 2024 : हैदराबादनं पटकावलं प्लेट ग्रुपचं विजेतेपद, HCA अध्यक्षांनी संघाला दिलं तीन वर्षाचं टार्गेट

Ranji Trophy 2024 Hyderabad : तिलक वर्माच्या संघाने यंदाच्या रणजी संघात चांगली कामगिरी केली होती. त्यानंतर त्यांच्यावर बक्षिसांचा वर्षाव होत आहे.

अनिरुद्ध संकपाळ

Ranji Trophy 2024 Hyderabad : रणजी ट्रॉफी 2024 च्या अखेरच्या साखळी फेरीत हैदराबाद संघाने मेघालयचा 5 विकेट्सनी पराभव केला. या विजयाबरोबरच हैदराबादने रणजी ट्रॉफीच्या एलिट ग्रुपमध्ये प्रवेश केला आहे. मेघालय विरूद्धच्या सामन्यात तिलक वर्मा आणि अनुभवी गहलौत राहुल सिंह यांच्या दुसऱ्या डावातील अर्धशतकी खेळीमुळे हैदराबाद एलिट ग्रुमध्ये दाखल झाली.

हैदराबादने मेघालयविरूद्धचा सामना जिंकल्यानंतर राज्य क्रिकेट असोसिएशनने खेळाडूंवर बक्षीसांचा वर्षाव केला. त्यांनी यंदाच्या रणजी ट्रॉफीमध्ये प्लेट ग्रुपचे विजेतेपद पटकावल्यामुळे 10 लाख रूपये बक्षीस आणि चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना 50 हजार रूपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

हैदराबाद क्रिकेट संघ एवढ्यावरच थांबले नाही तर असोसिएशनचे प्रमुखे जगन मोहन राव अरसिन्नापल्ली यांनी जर हैदराबाद संघाने पुढच्या तीन वर्षात रणजी ट्रॉफी जिंकली तर प्रत्येक खेळाडूला BMW कार देण्याचे आश्वासन दिलं आहे. तसचे अधिकचे कोटी रूपये बक्षीस देखील मिळणार आहे.

राव यांनी द न्यू इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हणाले की, 'बीएमडब्लू आणि एक कोटी रूपये बक्षीस देण्याची घोषणा ही खेळाडूंना प्रेरित करण्यासाठी केली आहे. पुढच्या वर्षी रणजी ट्रॉफी जिंकणे शक्य नाही म्हणून मी पुढच्या तीन हंगामाचे टार्गेट दिले आहे.'

ते पुढे म्हणाले की, 'आमची रविवारी पहिली सर्वसाधारण बैठक झाली. त्यात आम्ही भविष्यात काय करता येईल याची चर्चा केली. सध्याच्या घडीला जिमखाना मैदानावर हैदराबाद क्रिकेट अकॅडमी ऑफ एक्सलंस सुरू आहे. मी शहरातील चार वेगवेगळ्या ठिकाणी चार सॅटेलाईट अकॅडमी स्थापन करण्याचे आश्वासन दिलं आहे. यामुळे क्रिकेपटूंनी त्यांच्या जवळच्या ठिकाणी उत्तम क्रिकेट फॅसिलिटी मिळू शकेल.'

'हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत जवळपास जिल्हे येतात. आम्ही प्रत्येक जिल्ह्यात एक छोटं स्टेडियम उभारण्याची योजना आखत आहोत. यामुळे जिल्ह्यातील या प्रमुख कार्यालयांना गुणवान खेळाडू शोधणं आणि त्यांना तयार करणं शक्य होईल.'

हैदराबादने 1937-38 आणि 1986-87 मध्ये रणजी ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर मात्र गेल्या हंगामात ते एलिट ग्रुप बी मध्ये तळात पोहचल्याने त्यांना प्लेट डिव्हिजनमध्ये जावं लागलं होतं. त्यांनी गेल्या हंगामात लीग स्टेजमध्ये सात सामन्यापैकी फक्त एक सामना जिंकला होता.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Disha Patani’s house firing incident: दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन शूटर्सचा अखेर गाझियाबादमध्ये खात्मा!

Nagpur Crime : अपघाताच्या विम्याच्या कागदपत्रासाठी मागितले आठ हजार; उपनिरीक्षक, हेडकॉन्स्टेबल एसीबीचा जाळ्यात

Shital Mahajan : स्पेनमध्ये स्कायडायव्हिंग करून शीतल महाजन यांच्या पंतप्रधानांना शुभेच्छा

INDW vs AUSW: टीम इंडियाच्या नारी शक्तीचा ऐतिहासिक विजय! ऑस्ट्रेलियाचा वन डे क्रिकेट इतिहासात असा पराभव कुणी केलाच नव्हता...

Archana Kute: 'ज्ञानराधा मल्टिस्टेट'च्या अर्चना कुटेंना पुण्यातून अटक; छाप्यात काय-काय सापडलं?

SCROLL FOR NEXT