Shreyas Iyer news in marathi sakal
Cricket

Ranji Trophy : फायनलमध्येही श्रेयस अय्यर ठरला सपशेल फ्लॉप! उमेश यादवने 'त्या' बॉलवर केली शिकार

खराब फॉर्ममुळे राष्ट्रीय संघातून वगळण्यात आलेल्या अय्यरला बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेट न खेळल्यामुळे केंद्रीय करारातूनही वगळले....

Kiran Mahanavar

Ranji Trophy Final Shreyas Iyer Failed : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू श्रेयस अय्यरसाठी मागील एक दोन महिने एकदम खराब गेले आहे. खराब फॉर्ममुळे राष्ट्रीय संघातून वगळण्यात आलेल्या अय्यरला बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेट न खेळल्यामुळे केंद्रीय करारातूनही वगळले. आता हा खेळाडू देशांतर्गत क्रिकेट खेळत आहे, पण त्याची बॅटमधून काय धावा निघत नाही. श्रेयस अय्यरची रणजी ट्रॉफी 2024 मध्ये अत्यंत निराशाजनक कामगिरी राहिली आहे. उपांत्य फेरीनंतर तो फायनलमध्येही फ्लॉप ठरला आहे.

रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्येही श्रेयस अय्यर फ्लॉप

रणजी ट्रॉफी 2024 चा अंतिम सामना मुंबई आणि विदर्भ यांच्यात खेळला जात आहे. यामध्ये विदर्भाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रेयस अय्यर मोठी खेळी खेळून संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत घेऊन जाईल, अशी आशा मुंबईकरांना होती. मात्र तो पुन्हा एकदा भरवशावर उभा राहिला नाही. आणि उमेश यादवच्या त्या शॉर्ट बॉलवर तो पुन्हा एकदा आऊट झाला. त्याला फक्त 15 चेंडूत 7 धावा करता आल्या.

श्रेयस अय्यर उपांत्य फेरीतही ठरला फ्लॉप

बीसीसीआयने केंद्रीय करारातून काढून टाकल्यानंतर श्रेयस अय्यर उपांत्य फेरीत तामिळनाडूविरुद्ध खेळला होता. पण या सामन्यातही तो फ्लॉप ठरला. केवळ 3 धावा करून तो संदीप वॉरियरच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याच सामन्यात शार्दुल ठाकूरने शतक झळकावून संघाला विजय मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली होती.

श्रेयस अय्यरची वर्ल्ड कप 2023 मध्ये कामगिरी चांगली होती. विराट कोहलीनंतर तो संघाचा तिसरा सर्वोत्तम धावा करणारा खेळाडू होता. पण कसोटीच्या फॉरमॅटमध्ये तो बराच काळ संघर्ष करत आहे. आता तो टीम इंडियाचा भाग नाही आणि केंद्रीय करारातूनही बाहेर आहे. अशा परिस्थितीत देशांतर्गत क्रिकेटमधील त्याच्या कामगिरीत सुधारणा होत नसेल, तर कसोटीसह कोणत्याही फॉरमॅटसाठी संघात पुनरागमन करणे त्याच्यासाठी कठीण होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : सोने पुन्हा स्वस्त, चांदीचाही भाव कमी, खरेदीपूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Sangli IT Bogus Raid : I Am From Income Tax म्हणत मध्यरात्री छापा, डॉक्टरला दीड किलो सोनं अन् १५ लाखांना चुना लावला...

भारतीयांमध्ये खेळाडूवृत्ती नाही...! शाहिद आफ्रिदीने 'Handshake' प्रकरणावर सूर्यकुमार यादव, BCCI ला सुनावले

IOB Recruitment 2025: IOB मध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया कशी होईल?

Dehradun Sahastradhara Cloudburst : सहस्रधारात पावसाचा हाहाकार, दुकाने गेली वाहून; अनेक जण बेपत्ता

SCROLL FOR NEXT