Ravichandran Ashwin esakal
Cricket

IND vs ENG 5th Test : कसोटी क्रिकेटच्या इतिहासात असं दुसऱ्यांदाच होणार, अश्विन-बेअरस्टोमुळं अनोखा योगायोग

IND vs ENG 5th Test : एका कसोटी सामन्यात एकापेक्षा जास्त खेळाडूंनी आपला 100 वा कसोटी सामना खेळण्याची घटना कितीवेळा झाली आहे.

अनिरुद्ध संकपाळ

IND vs ENG 5th Test Ravichandran Ashwin Jonny Bairstow 100th Test Match : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना 7 मार्चपासून धरमशाला येथे सुरू होत आहे. मालिकेत भारताने 3-1 अशी विजयी आघाडी घेतली आहे. जरी मालिकेचा विजेता ठरला असला तरी हा कसोटी सामना दोन्ही संघासाठी खास आहे. कारण दोन्ही संघातील एक एक खेळाडू हे त्यांचा 100 वा कसोटी सामना खेळणार आहेत.

भारताचा रविचंद्रन अश्विन आणि इंग्लंडचा जॉनी बेअरस्टो हे दोघेही आपला 100 वा कसोटी सामना धरमशाला येथे खेळणार आहे. क्रिकेटच्या इतिहासात एकाचवेळी वेगवेगळ्या संघातील दोन खेळाडू आपला 100 वा कसोटी सामना खेळण्याची ही फक्त दुसरी वेळ आहे. यापूर्वी 2013 मध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया सामन्यात अॅशेस मालिकेत एलिस्टर कूक आणि मायकल क्लार्क या दोन वेगवेगळ्या संघातील खेळाडूंनी एकाचवेळी आपला 100 वा कसोटी सामना खेळला होता.

दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलिस, शॉन पोलॉक आणि न्यूझीलंडचा स्टीफन फ्लेमिंग यांनी 2006 मध्ये सेच्युरियनमध्ये आपला 100 वा कसोटी सामना खेळला होता. क्रिकेट इतिहासात एकाच सामन्यात तीन खेळाडूंनी आपला 100 वा कसोटी सामना खेळण्याची ही पहिली आणि एकमेव वेळ होती.

त्यानंतर वेस्ट इंडीज आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यात इंग्लंडचे दोन खेळाडू आपला 100 वा कसोटी सामना खेळण्याचा योग आला होता. ओल्ड ट्रॅफर्डमध्ये खेळला गेलेल्या या सामन्यात इंग्लंडचा माजी कर्णधार माईकल एथर्टन आणि एलेक स्टीवर्ट यांनी हा माईलस्टोन पार केला होता.

(Cricket Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Latest Marathi Breaking News Live Update: सरकारी जमिनीवरील गृहनिर्माण संस्थाच्या स्वयंपुनर्विकासाला गती देणार - बावनकुळे

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

Akola Crime : अल्पवयीन चोरट्याकडून २१.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त; घरफोडी प्रकरणाचा वेगवान उलगडा

Railway News: प्रदूषणाला रेल्वेचं जोरदार उत्तर! आता पैसा अन् वेळही वाचणार; भारतीय रेल्वेची नवी वाहतूक क्रांती सुरू, योजना काय?

SCROLL FOR NEXT