Elina Svitolina Ukraine Women Tennis Player refuse to play Russian and Belarusian tennis players
Elina Svitolina Ukraine Women Tennis Player refuse to play Russian and Belarusian tennis players ESAKAL
क्रीडा

रशियाबाबत भुमिका स्पष्ट करा नाही तर.. युक्रेनच्या महिला टेनिसपटूची धमकी

सकाळ डिजिटल टीम

युक्रेन आणि रशिया (Russia Ukraine Crisis) यांच्यात गेल्या 24 फेब्रुवारीपासून युद्ध सुरू आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला केला असून त्यांचे लष्कर युक्रेनच्या हद्दीत घुसले (Russia Invades Ukraine) आहे. यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक देशांनी युक्रेनवर निर्बंध घालण्यास सुरूवात केली आहे. याचबरोबर क्रीडा जगतातूनही रशियावर बॅन घालण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. फिफाने रशियाला कतार वर्ल्डकपमध्ये सहभागी होण्यावर बंदी घातली आहे. आता युक्रेनची स्टार महिला टेनिसपटू एलिना स्वितोलिनियाने (Elina Svitolina) रशियन आणि बेलारूसच्या (Belarus) टेनिसपटूंविरूद्ध खेळण्यास नकार दिला आहे. तिने रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर त्याविरोधात टेनिस संघटनांनी कोणतीही भुमिका न घेण्यावर देखील टीका केली आहे.

एलिना ही जागतिक क्रमवारीत 15 व्या स्थानावर आहे. ती वर्ल्ड टेनिस असोसिएशनच्या (WTA) माँटेरे येथे होणाऱ्या स्पर्धेत उतरणार आहे. तिचा पहिलाच सामना रशियाच्या अ‍ॅनास्तासिया पोटापोव्हा बरोबर होणार आहे. याचबरोबर रशियाच्या कामिला राखिमोव्हा आणि अ‍ॅना कालिन्सकाया यांचाही या ड्रॉमध्ये समावेश आहे.

याबाबत युक्रेनच्या एलिनाने ट्विटवर पोस्ट लिहिली, पोस्टमध्ये ती म्हणते 'जोपर्यंत आयोजक योग्य ती कारवाई करत नाहीत तोपर्यंत मी ही स्पर्धा खेळणार नाही. मी रशिया किंवा बेलारूसच्या कोणत्याही टेनिसपटूविरूद्ध सामना खेळणार नाही. मी रशियन खेळाडूंना दोष देत नाही. मी ज्या रशिन आणि बेलारूसच्या खेळाडूंनी धाडसाने युद्धाविरूद्ध आपले मत व्यक्त केले त्यांचा आदर करते. त्यांचा पाठिंबा महत्वाचा आहे.'

मात्र ती लिहिते की, 'सध्याच्या परिस्थितीत एटीपी (ATP), वर्ल्ड टेनिस असोसिएशन आणि आयटीएफ (ITF) या आयोजकांनी त्यांची भुमिका स्पष्ट केली पाहिजे.'

एलिनाच्या या भुमिकेला युक्रेनच्या मार्टा कोस्टयूक आणि लेसिया त्सुरनेको या टेनिसपटूंनी देखील पाठिंबा दिला आहे. दोघींनीही सोशल मीडियावर पत्र पोस्ट केले आहे. या सर्व खेळाडूंनी वर्ल्ड टेनिस असोसिएशनने रशिया सरकारचा त्वरित निषेध करावा आणि रशियातील सर्व स्पर्धा मागे घ्याव्यात. आयटीएफने देखील असेच करावे अशी मागणी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT