ENG vs IND 5th Test
ENG vs IND 5th Test sakal
क्रीडा

ENG vs IND: चाहत्याकडून मीम्सचा पाऊस; 'भारत जिकूं शकतो फक्त...'

Kiran Mahanavar

ENG vs IND 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटीचा निर्णय आता सामन्याच्या पाचव्या दिवसात होणार आहे. सध्या या कसोटी सामन्यात इंग्लंड संघ मजबूत स्थितीत असल्याचे आपल्याला दिसत येत आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत जॉनी बेअरस्टो आणि जो रूट यांनी ही भागीदारी 150 पार नेत इंग्लंडला दुसऱ्या डावात 259 धावांपर्यंत पोहचवले. जो रूट 112 चेंडूत 76 धावावर तर जॉनी बेअरस्टो 87 चेंडूत 72 धावावर खेळत आहे. इंग्लंडला विजयासाठी फक्त 119 धावांची गरज असून त्यांच्या हातात सात विकेट शिल्लक आहेत. अशा स्थितीत भारतीय संघाला या सामन्यात पुनरागमन करणे आणि पुन्हा विजय मिळवणे अशक्य वाटत आहे.(eng vs ind 5th test indian fans praying for rain viral memes on twitter)

एकेवेळी विजयाच्या दिशेने जाणाऱ्या टीम इंडिया मात्र आता अडचणीत सापडली आहे. त्यामुळे त्रस्त भारतीय चाहते आता विजयाऐवजी ड्रॉची आपेक्षा करत आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर इंग्लंड मजबूत स्थितीत दिसून येत आहे. सोशल मीडियावर भारतीय चाहते बर्मिंगहॅममध्ये पावसासाठी प्रार्थना करत आहेत. भारतीय गोलंदाजांवर विश्वास न ठेवता पावसाची अपेक्षा करणारे मीम्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

टीम इंडियाने चौथ्या दिवशी खराब गोलंदाजी केली. त्या कारणाने चाहते बर्मिंगहॅममध्ये पावसासाठी प्रार्थना करत आहे. इंग्लंडच्या खेळाडूंनी एकापाठोपाठ एक भागीदारी करत सामन्याचे चित्र बदले. चौथ्या दिवशी भारतीय गोलंदाज पूर्णपणे असहाय्य दिसत होते. भारताने दुसऱ्या डावात 245 धावा केल्या आणि इंग्लंडसमोर 364 धावांचे लक्ष्य ठेवले. चेतेश्वर पुजाराने 66 आणि ऋषभ पंतने 57 धावा केल्या. यांच्याशिवाय एकाही फलंदाजाला भारतासाठी चांगली खेळी करता आली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: मोदी सरकार आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करण्याच्या तयारीत; ग्राहकांना होणार थेट फायदा

Jharkhand ED Raid : 15 हजार पगार, 10 हजार लाच.. अन् घरात सापडले 30 कोटी; नोकराच्या घरातली कॅश कुणाची? 'या' मंत्र्यांचं कनेक्शन?

Latest Marathi News Update : निवडणूक जिंकले तर अभिनय सोडणार- कंगना

Sharad Pawar Poster: "चहावाल्याचे दुकान फक्त साखरवाला बंद करू शकतो...." पवारांच्या प्रचारसभेतील बोर्ड होताहेत तुफान व्हायरल

Anjali Arora: कच्चा बदाम गर्ल अंजली अरोरा साकारणार सीतेची भूमिका; म्हणाली, "साई पल्लवीसोबत जर तुलना झाली तर..."

SCROLL FOR NEXT