Igor Štimac | Indian Football Team Sakal
क्रीडा

IND vs AFG, Football: टीम इंडियाच्या लाजिरवाण्या पराभवानंतर चाहत्यांकडून कोचला हटवण्याची मागणी

India Football Team: भारतीय फुटबॉल संघाला अफगाणिस्तानविरुद्ध पराभवाचा धक्का बसल्यानंतर चाहत्यांकडून राग व्यक्त केला जात आहे.

Pranali Kodre

India Football Team News: भारतीय फुटबॉल संघाला मंगळवारी मोठा धक्का बसला. मंगळवारी अफगाणिस्तानने गुवाहाटीला झालेल्या सामन्यात भारताला 2-1 अशा गोलफरकाने पराभव केला. त्यामुळे भारताच्या फिफा विश्वचषक 2026 आणि आशिया कप 2027 साठीच्या क्वालिफायर्सच्या तिसऱ्या फेरीत पोहचण्याच्या आशांना सुरुंग लागला आहे.

अशातच चाहत्यांकडून भारतीय पुरुष फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक इगॉर स्टिमॅक यांना काढून टाकण्याची मागणी केली जात आहे.

हा सामना भारताचा कर्णधार सुनील छेत्रीचा 150 वा आंतरराष्ट्रीय सामना होता. त्याने या सामन्यात 38 व्या मिनिटालाच पेनल्टीवर अप्रतिम गोलही करत भारताला आघाडी मिळवून दिली होती.

भारताने दुसऱ्या हाफमध्येही ही आघाडी कायम ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु 70 व्या मिनिटाला रेहमत अकबारीने अफगाणिस्तानला बरोबरी साधून दिली, तर शरिफ मुखम्मदने 88 व्या मिनिटाला दुसरा गोल करत अफगाणिस्तानला आघाडी मिळवून दिली.

त्यामुळे या सामन्यात 117 व्या स्थानी असलेल्या भारताला 158 व्या क्रमांकावरील अफगाणिस्तानकडून लाजिरवाणा पराभव स्विकारावा लागला.

या पराभवामुळे भारताला 3 महत्त्वाचे गुणही मिळवता आले नाही. पण आता भारत दुसऱ्या फेरीत अ गटात भारताकडे चारच गुण आहेत, तर अफगाणिस्तानकडेही 4 गुणच आहेत.

कतार 9 गुणांसह अव्वल क्रमांकावर आहे. तर कुवेत 3 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. आता भारताला तिसऱ्या फेरीत पोहचण्यासाठी आगामी उर्वरित दोन सामन्यात मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे.

दरम्यान गेल्यावर्षी भारतीय फुटबॉल संघाने शानदार कामगिरी केली होती. क्रमवारीतही 100 आतील स्थान मिळवले होते. परंतु, त्यानंतर सातत्याने संघाची कामगिरी खालावली. आशिया कप 2023 स्पर्धेतही भारताला सलग तीन सामन्यातील पराभवासह स्पर्धेतून बाहेर पडावे लागले होते.

त्यानंतर आता 21 मार्चला झालेल्या अफगाणिस्तानविरुद्ध सौदी अरेबियात झालेल्या सामन्यात भारताला गोल शुन्य बरोबरीतच समाधान मानावे लागले होते. त्यानंतर मायदेशातील सामन्यातही भारताला अफगाणिस्तानविरुद्ध पराभवाचा धक्का बसला आहे.

याशिवाय भारताने फिफा विश्वचषक आणि आशिया कपसाठीच्या क्वालिफायर्सच्या दुसऱ्या फेरीत कतारविरुद्ध पराभव स्विकारावा लागला आहे. भारताने या फेरीत केवळ कुवेत विरुद्ध विजय मिळवला आहे. यानंतर आता चाहते स्टिमॅक यांना प्रशिक्षक पदावरून दूर करावे यासाठी मागणी करत आहेत.

यापूर्वी भारताच्या अपयशासाठी अनेकदा स्टिमॅक यांनी पायाभूत सुविधा, क्लब आणि खेळाडूंना दोषी ठरवले आहे. मात्र आता भारतीय संघाच्या मोठ्या अपयशानंतर चाहत्यांकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. त्यातच त्यांनी संघाच्या निवडीसाठी घेतलेल्या ज्योतिषी सल्ल्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

दरम्यान भारताला क्वालिफायरच्या दुसऱ्या फेरीतील आणखी दोन सामने खेळायचे आहेत. त्यामुळे या दोन सामन्यांत चांगली कामगिरी करण्याचे आव्हान भारतासमोर आहे.

भारताला 6 जून 2024 रोजी कुवेतविरुद्ध सामना खेळायचा आहे, तर 11 जून 2024 रोजी कतारविरुद्ध सामना खेळायचा आहे. कुवेतविरुद्धचा सामना भारतात होईल, तर कतारविरुद्धचा सामना कतारला होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT