lewandowski 
क्रीडा

FIFA 2021 : मेस्सीला मागे टाकत लेवांडोवस्की ठरला सर्वोत्कृष्ट खेळाडू

सकाळ डिजिटल टीम

महिलांमध्ये एलेक्सिया पुटलेस फिफा २०२१ ची सर्वोत्कृष्ट प्लेअर ठरली.

पोलंडचा आणि बायर्न म्युनिचचा फुटबॉलपटू रॉबर्ट लेवांडोवस्कीने (Robert Lewandowski) दिग्गज फुटबॉलपटू लिओनल मेस्सीला ( Lionel Messi) मागे टाकून फिफाच्या पुरस्कारावर नाव कोरलं आहे. २०२१ चा फिफाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू (FIFA 2021 Best Player) पुरस्कार लेवांडोवस्कीला जाहीर झाला आहे. तर महिलांमध्ये Alexia Putellas सर्वोत्कृष्ट प्लेअर ठरली.

फिफाच्या २०२१ च्या सर्वोत्कृष्ट खेळाडुंच्या स्पर्धेत अर्जेंटीना आणि पॅरिस सेंट जर्मनकडून खेळणाऱ्या मेस्सीशिवाय मोहम्मद सालाह याचंही नाव होतं. मात्र या दोघांना मागे टाकून लेवांडोवस्की याने बाजी मारली. लेवांडोवस्कीने २०२०-२०२१ या सत्रात म्यूनिचकडून खेळताना ४१ गोल नोंदवले तर २०२१ या कॅलेंडर वर्षात ४३ गोल त्याच्या नावावर आहेत.

आतापर्यंत मेस्सीने सहावेळा या पुरस्कारावर नाव कोरलं आहे. तर सलग दुसऱ्यांदा लेवांडोवस्कीने हा पुरस्कार जिंकला. मेस्सीने अर्जेंटिनाकडून खेळत कोपा अमेरिका कप जिंकला. त्यानं आतापर्यंत सात वेळा बेलोन डी ओर ट्रॉफी जिंकली. तर मोहम्मद सालाह याला २०१८ नंतर दुसऱ्यांदा या यादीत स्थान मिळालं आहे.

१२ वर्षानंतर रोनाल्डो आघाडीच्या तीन खेळाडूंमध्येही नाहीय. पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू रोनाल्डो फिफा २०२१ सर्वोत्कृष्ट खेळाडुंच्या नामांकन यादीतून आधीच बाहेर पडला होता. पाचवेळा रोनाल्डोने हा पुरस्कार जिंकला होता. २००७ पासून रोनाल्डोला नामांकनाच्या यादीत येण्यात दोनवेळा अपयश आले आहे. याआधी २०१० मध्ये तो पुरस्काराच्या यादीतून बाहेर होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate latest News : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होणार ; राजीनामा अजित पवारांनी स्वीकारला

Latest Marathi News Live Update : दिव्यांग व्यक्तींच्या विवाहास शासनाचे प्रोत्साहन

Ishan Kishan : १० षटकार, ६ चौकार! इशान किशनचे वादळी शतक; अभिषेक शर्माच्या विक्रमाशी बरोबरी, पूर्ण केल्या ५०० धावा

31 Dec Deadline alert : ३१ डिसेंबर शेवटची संधी!, बँक अन् ‘आधार’शी संबंधित 'ही' महत्त्वाची कामे केली नाहीत, तर पडेल महागात!

'एक दो तीन' गाण्यावेळी माधुरी दीक्षितसोबत नक्की काय घडलं? की, सरोज खान वैतागून म्हणाल्या...'तू घरी जा...'

SCROLL FOR NEXT