Sakshi Suryavanshi Team in Free Pistol Event
Sakshi Suryavanshi Team in Free Pistol Event esakal
क्रीडा

Sports News : वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धेत महाराष्ट्राच्या पोरींचा दबदबा; 'फ्री पिस्टल इव्हेंट'मध्ये पटकावलं 'सुवर्ण'

धर्मवीर पाटील

गेली दोन वर्षे ती या स्पर्धेचं ध्येय बाळगून तयारी करत होती. जेमतेम आर्थिक परिस्थिती असतानाही केवळ जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तिनं मेहनतीनं हे यश मिळवलं आहे.

इस्लामपूर : बाकू (Azerbaijan) इथं सुरू असलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धेत (World Championship Tournament) इस्लामपूरच्या (जि. सांगली) साक्षी अनिल सूर्यवंशीच्या टीमनं सुवर्णपदक पटकावलं आहे. फ्री पिस्टल ५० मीटर इव्हेंट (Free Pistol Event) या प्रकारात हे यश मिळालं आहे.

तिच्या (Sakshi Suryavanshi) टीममध्ये टियाना आणि करणदीप कौर या सहकाऱ्यांचा समावेश आहे. साक्षी आणि तिच्या सहकाऱ्यांमुळं महाराष्ट्रासह सांगली जिल्ह्याचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकलं असून इस्लामपूर शहराच्या लौकिकातही भर पडली आहे.

साक्षी ही इस्लामपूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाची विद्यार्थिनी असून सध्या बीसीएच्या दुसऱ्या वर्गात शिकत आहे. राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेमधून तिची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी झालेली निवड तिनं सार्थ ठरवून दाखवली आहे. साक्षी ही साखराळे (ता. वाळवा) गावची आहे.

गेली दोन वर्षे ती या स्पर्धेचं ध्येय बाळगून तयारी करत होती. जेमतेम आर्थिक परिस्थिती असतानाही केवळ जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तिनं मेहनतीनं हे यश मिळवलं आहे. साऊथ एशियन मेडलिस्ट असलेले जितेंद्र विभूते हे तिचे प्रशिक्षक आहेत. आई ब्युटीपार्लर चालवत शिवणकाम करते आणि वडील वाहन व्यवसायात आहेत. तिला या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जात असताना आर्थिक अडचण निर्माण झाली होती.

त्यासाठी कुटुंबीयांना कर्ज काढावं लागलं. याशिवाय तिच्या या वाटचालीत वाळवा शिक्षण संस्थेचे सहसचिव ऍड. धैर्यशील पाटील, राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील, माजी नगरसेवक कपिल ओसवाल, तत्कालीन प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी, तहसीलदार प्रदीप उबाळे, अजय शिंदे, उद्योजक सतीश सूर्यवंशी, वर्षाराणी तोडकर, सांगली जिल्हा रायफल असोसिएशनचे अध्यक्ष अभिजित आंदळकर, ममता आंदळकर, शूटर नईम नरदेकर यांचे सहकार्य लाभले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेतात, ठाकरे गटाने असं का म्हटलं?

Aditya Dhar & Yami Gautam : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यामी-आदित्यला पुत्ररत्न; जाणून घ्या बाळाचं नाव आणि त्याचा अर्थ

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमने-सामने

Latest Marathi Live News Update: संसदेची सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी आजपासून CISF कडं!

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

SCROLL FOR NEXT