Hardik Pandya likely to take over T20, ODI captaincy from Rohit Sharma
Hardik Pandya likely to take over T20, ODI captaincy from Rohit Sharma 
क्रीडा

Rohit Sharma: तेलही गेले तूपही गेले हाती राहिले धुपाटणे! रोहितची टी-20 पाठोपाठ वनडेची कॅप्टन्सीही...

Kiran Mahanavar

Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्माच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. फिटनेस आणि फॉर्ममध्ये झगडणाऱ्या हिटमॅनवर आणखी एक धोका निर्माण झाला आहे. दुखापतीमुळे बांगलादेशविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतून बाहेर पडलेल्या रोहितला पांढऱ्या चेंडूच्या कर्णधारपदावरून हटवले जाऊ शकते. बीसीसीआय या मुद्द्यावर गांभीर्याने विचार करत आहे. रोहितच्या जागी हार्दिक पांड्याकडे टी-20 आणि वनडे संघाची कमान सोपवली जाऊ शकते. मात्र, अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

आशिया चषक आणि टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर रोहित शर्माच्या फॉर्मसोबतच त्याच्या कर्णधारपदावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्याचा फिटनेस हा टीम इंडियासाठी मोठा मुद्दा आहे. हार्दिक पांड्या वनडे आणि टी-20 संघाचा नवा कर्णधार बनू शकतो. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हार्दिकशी याबाबत बोलणे झाले असून त्याला उत्तर देण्यासाठी काही दिवसांची मुदत मागितली आहे. सध्या याबाबत कोणताही निर्णय झालेला नसला तरी श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत हार्दिकला कर्णधारपद मिळणार हे निश्चित आहे. रोहितच्या अनुपस्थितीत हार्दिकने यापूर्वीच भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, हार्दिक पांड्या श्रीलंकेविरुद्ध 3 जानेवारीपासून मुंबईत सुरू होणाऱ्या टी-20 मालिकेत भारताचे नेतृत्व करू शकतो. या मालिकेतील दुसरा सामना पुण्यात (५ जानेवारी) आणि तिसरा सामना राजकोटमध्ये (७ जानेवारी) होणार आहे. वृत्तानुसार रोहित शर्माला अंगठ्याच्या दुखापतीतून सावरण्यासाठी आणखी वेळ लागू शकतो. मात्र तो टी-20 कर्णधारपदावरून पायउतार होणार की हे प्रकरण तूर्तास स्थगित करण्यात आले आहे, हे स्पष्ट झालेले नाही.

ऑस्ट्रेलियातील टी-20 विश्वचषकातून भारत उपांत्य फेरीतून बाहेर पडल्यापासून, नवीन निवड समितीने पदभार स्वीकारल्यानंतर कर्णधारपदात बदल होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र यासंदर्भात अद्याप कोणतीही औपचारिक घोषणा करण्यात आलेली नाही. अटकळ असूनही, सर्वोच्च परिषदेच्या बैठकीत भारताच्या टी-20 कर्णधारपदावर कोणतीही चर्चा झाली नाही याची पुष्टी केली जाऊ शकते.

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, “हे प्रकरण सर्वोच्च परिषदेच्या अजेंड्यावरही नव्हते आणि त्यावर चर्चाही झाली नाही. कर्णधारपदाचा निर्णय फक्त निवड समितीच घेऊ शकते. तथापि भारताचा टी-20 संघ पूर्ण फेरबदलासाठी आहे आणि हार्दिक पांड्याला कर्णधारपदाचा नवा पर्याय म्हणून विचार केला जात आहे.

2023 मध्ये भारताला फक्त सहा टी-20 सामने खेळायचे आहेत. यावर्षी एकदिवसीय विश्वचषकामुळे बहुतेक मालिका एकदिवसीय फॉर्मेटमध्ये खेळल्या जाणार आहे. रोहित 2024 टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय व्यवस्थापनाच्या योजनेत नाही. अशा स्थितीत हार्दिकला नवा कर्णधार बनवले जाऊ शकते. मात्र, हार्दिकची वनडेत कर्णधारपदी वर्णी लागण्यापूर्वी त्याच्यावरील कामाचा ताण आणि त्याचा परिणाम यावर चर्चा होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Samata Parishad : छगन भुजबळ वेगळी भूमिका घेणार? समता परिषदेच्या बैठकीत कार्यकर्त्यांची मागणी?

T20 World Cup: अमेरिकेकडून खेळणाऱ्या हरमीतने रोहितच्या कोचला दिलं श्रेय! म्हणाला, 'त्यांनीच माझ्यात...'

Mumbai Local : गुड न्यूज! मुंबई लोकल धावणार 'टाईम टू टाईम', रेल्वेकडून 'हे' मोठे बदल

Jonty Rhodes : गंभीर 2019 पासूनची परंपरा मोडणार; जॉन्टी रोड्स होणार टीम इंडियाचा नवा फिल्डिंग कोच?

Rajeev Karandikar Debate : ईव्हीएम प्रकरण न्यायालयात; मशीन हॅक करता येते की नाही या प्रश्नावर राजीव करंदीकर काय म्हणाले? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT