ODI World Cup Warm-up Matches 2023 Schedule
ODI World Cup Warm-up Matches 2023 Schedule  
क्रीडा

World Cup 2023 : वर्ल्ड कप सराव सामन्यांचे शेड्यूल जाहीर, टीम इंडियाचा 'या' संघाशी होणार सामना

Kiran Mahanavar

ODI World Cup Warm-up Matches 2023 Schedule : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आगामी एकदिवसीय वर्ल्ड कपसाठी सराव सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. आयसीसीने बुधवारी सांगितले की, वर्ल्ड कपच्या मुख्य सामन्यांपूर्वी 10 सराव सामने खेळवले जाणार आहेत. भारतीय संघ इंग्लंड आणि नेदरलँड्सविरुद्ध सराव सामने खेळणार आहे. 30 सप्टेंबरला गुवाहाटीमध्ये त्याचा सामना इंग्लंडशी आणि 3 सप्टेंबरला तिरुअनंतपुरममध्ये नेदरलँडशी होणार आहे.

5 ऑक्टोबर रोजी वर्ल्ड कप सुरू होण्यापूर्वी 10 संघ प्रत्येकी 50 षटकांचे दोन सराव सामने खेळणार आहेत. भारतातील तीन वेगवेगळ्या शहरांमध्ये हे सामने होणार आहेत. गुवाहाटी आणि तिरुअनंतपुरमसह हैदराबादलाही सराव सामन्यांचे यजमानपद मिळाले. साखळी फेरीचे तीन सामनेही हैदराबादमध्ये खेळवले जाणार आहेत. या मैदानावर पाकिस्तानचा सामना 6 ऑक्टोबरला नेदरलँडशी आणि 10 ऑक्टोबरला श्रीलंकेशी होणार आहे. दरम्यान, 9 ऑक्टोबर रोजी नेदरलँड आणि न्यूझीलंडचे संघ आमनेसामने असतील.

सराव सामन्यांचे वेळापत्रक

  • 29 सप्टेंबर - बांगलादेश विरुद्ध श्रीलंका गुवाहाटी

  • 29 सप्टेंबर - दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान तिरुवनंतपुरम

  • 29 सप्टेंबर - न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान हैदराबाद

  • 30 सप्टेंबर - भारत विरुद्ध इंग्लंड गुवाहाटी

  • 30 सप्टेंबर - ऑस्ट्रेलिया विरुद्ध नेदरलँड तिरुवनंतपुरम

  • 2 ऑक्टोबर - इंग्लंड विरुद्ध बांगलादेश गुवाहाटी

  • 2 ऑक्टोबर - न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिरुवनंतपुरम

  • 3 ऑक्टोबर - अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका गुवाहाटी

  • 3 ऑक्टोबर - भारत विरुद्ध नेदरलँड तिरुवनंतपुरम

  • 3 ऑक्टोबर - पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया हैदराबाद

भारतातील 10 शहरांमध्ये ही स्पर्धा होणार

वर्ल्ड कप सामने भारतातील 10 शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत. हैदराबाद, अहमदाबाद, धर्मशाला, दिल्ली, चेन्नई, लखनौ, पुणे, बेंगळुरू, मुंबई आणि कोलकाता येथे सामने होणार आहेत. पहिला सामना अहमदाबादमध्ये 5 ऑक्टोबरला तर अंतिम सामना 19 नोव्हेंबरला होणार आहे. या विश्वचषकात एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. श्रीलंका आणि नेदरलँडचे संघ पात्रता फेरीतून या स्पर्धेत पोहोचले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपूर हळहळलं! खरेदीसाठी गेल्या जवानांवर काळाचा घाला, भीषण अपघातात दोंघाचा मृत्यू; ऑटोचालकासह सहा जवान गंभीर जखमी

Shikhar Dhawan: लेकाच्या विरहानं शिखर व्याकुळ; फादर्स डेच्या शुभेच्छा देताना म्हणाला, 'त्याच्याशी बोललो नाहीये...'

Jerusalem : दिवसाउजेडी हल्ले थांबवणार; गाझातील मदतकार्याच्या सोयीसाठी इस्राईलकडून घोषणा

Russia-Ukraine Conflict : ‘युक्रेन’बाबत स्वित्झर्लंडमध्ये बैठक; रशियाच्या अनुपस्थितीने तोडग्याची शक्यता कमीच

Prataprao Chikhlikar: मनोज जरांगेंची हवा नांदेडपर्यंत...! प्रतापराव चिखलीकरांचा गेम कसा झाला?

SCROLL FOR NEXT