ireland and uae qualifies icc t20 world cup 2022
ireland and uae qualifies icc t20 world cup 2022 Sakal
क्रीडा

T20 World Cup : आयर्लंड-युएई संघ टी-20 वर्ल्ड कपसाठी पात्र

सुशांत जाधव

ओमान येथील अल अमीरातच्या मैदानात ICC T20 World Cup 2022 Qualifier A गटातील सेमी फायनलमध्ये यूएईनं (UAE) नेपाळचा 68 धावांनी पराभव केला. दुसऱ्या सेमी फायनलमध्ये आयर्लंडने (Ireland) ओमानला 56 धावांनी शह देत फायनल गाठली. या विजयासह दोन्ही संघांनी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठी पात्रता सिद्ध केली. 24 फेब्रुवारी रोजी आयर्लंड आणि यूएई यांच्यात फायनल रंगणार आहे. तिसऱ्या स्थानासाठी ओमान आणि नेपाळ यांच्यात लढत होईल. (ICC T20 World Cup 2022 Ireland And UAE Qualifies Reaching Final )

पहल्या सेमी फायनलमध्ये युएई संघाने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करताना निर्धारित 20 षटकात 7 बाद 175 धावा केल्या होत्या. मोहम्मद वसीमने सर्वाधिक 70 धावांचे योगदान दिले. नेपाळकडून अबिनाश बोहरा आणि जितेंद्र मुखिया यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट घेतल्या. युएईकडून अहमद रझानं नेपाळचा अर्धा संघ तंबूत पाठवला. त्याने 19 धावा खर्च करून 5 विकेट घेतल्या. त्याच्या या भेदक माऱ्यामुळे नेपाळचा संघ 18.4 षटकात 107 धावांवर ऑल आउट झाला.

दुसऱ्या मॅचमध्ये नाणेफेक गमावलेल्या आयर्लंडने पहिल्यांदा बॅटिंग केली. गॅरेथ डेलानी 47 अँडी मॅकब्रायनच्या 36 धावांच्या जोरावर संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 7 बाद 165 धावा करुन ओमानसमोर 166 धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना ओमनचा डाव18.3 षटकात 109 धावांत आटोपला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : मनोज जरांगे अन् पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर; कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ; नेमकं काय घडलं?

IPL 2024, GT vs RCB Live Score: शाहरुख खानचे दमदार अर्धशतक, गुजरातने पार केला 120 धावांचा टप्पा

Nashik News : 10 वर्षानंतर धुळ झटकली; म्हाडा प्रकरणातील प्रस्ताव तपासण्याच्या सूचना

Latest Marathi News Live Update : एमके स्टॅलिन यांच्या पत्नीकडून तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात प्रार्थना

Ulhasnagar Crime : मटका किंगच्या मुलावर जीवघेणा हल्ला करणारा आरोपी जेरबंद ; इन्स्टाग्राम पोस्टमुळे अडकला जाळ्यात

SCROLL FOR NEXT