ICC Test Ranking India Vs Australia esakal
क्रीडा

ICC Test Ranking : ये क्या हुआ कैसे हुआ... ICC नं वेबसाईवर घातला गोंधळ अन् ऑस्ट्रेलिया झाली रागानं लाल

अनिरुद्ध संकपाळ

ICC Test Ranking India Vs Australia : आयसीसीच्या वेबसाईटवर आज कसोटी रँकिंगमध्ये बदल झाल्याचे दर्शवण्यात आले. या नव्या बदलानुसार भारताने ऑस्ट्रेलियाला रँकिंगमध्ये मागे टाकत अव्वल स्थान पटकावल्याचे दिसले. या बदलानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सची अवस्था अमर प्रेम चित्रपटातील राजेश खन्ना सारखी झाली असणार. तोही ये क्या हुआ कैसे हुआ कब हुआ... असं म्हणत असेल.

आज आयसीसीच्या वेबसाईटवरली बदललेल्या ICC Test Team Ranking चा हावला देत सगळीकडे भारताने ऑस्ट्रेलियाला मागे टाकत अव्वल स्थान पटकावले अशा बातम्या सुरू झाल्या. आयसीसीने दिलेल्या माहितीच्या आधारे या बातम्या देण्यात आल्याने त्यात चूक अशी काही नव्हती.

मात्र यामध्ये एक मोठा गोंधळ होता. ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या आपल्या शेवटच्या दोन कसोटी मालिका जिंकल्या होत्या. त्यामुळे त्यांचे गुण 126 झाले होते. तर भारताने बांगलादेशला 2 - 0 असा व्हाईट वॉशि दिल्यानंतर त्यांचे गुण 115 झाले होते. 8 जानेवारीच्या आकडेवारीनुसार 126 गुण घेत ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर होती. तर 115 गुणांसही भारत दुसऱ्या स्थानावर होती.

मात्र अवघ्या 9 दिवसांनी आयसीसीने 115 गुणांवर असलेल्या भारताला ICC Test Team Ranking मध्ये अव्वल स्थानावर बसवले. तर ऑस्ट्रेलियाचे गुण कमी करत 111 वर आणले आणि त्यांना दुसऱ्या स्थानावर बसवले. इथेच आयीसीसने मोठी चूक केली. कारण ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या कसोटी मालिकेनंतर कोणती कसोटी मालिका खेळलेली नाही अन् ती हरलेली देखील नाही. त्यामुळे त्यांचे गुण कमी होण्याचा प्रश्नच नव्हता.

अखेर दोन तासांनी आयसीसीच्या लक्षात आल्यानंतर वेबसाईटवर झालेला हा गोंधळ सुधारण्यात आला. त्यामुळे दोन तासापूर्वी अव्वल स्थानावर असलेला भारत पुन्हा आपल्या मूळ स्थानी म्हणजे दुसऱ्या स्थानावर आला. विशेष म्हणजे फेब्रुवारी महिन्यात ऑस्ट्रेलिया भारताच्या दौऱ्यावर येणार आहे.

या दौऱ्यात ऑस्ट्रेलिया संघ 4 कसोटी सामन्यांची गावसकर - बॉर्डर मालिका खेळणार आहे. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने फार महत्वाची आहे. भारताला सलग दुसऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जाण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेतील चारही कसोटी सामने जिंकावे लागतील.

सध्याच्या रँकिंगनुसार ऑस्ट्रेलिया आणि भारत अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. तर पाकिस्तान, बांगलादेश आणि गतविजेते न्यूझीलंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.

श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि वेस्ट इंडीज अजूनही रेसमध्ये आहेत. त्यांना रँकिंगमधील दुसरे स्थान पटकावण्याची संधी आहे. WTC cycle मध्ये जो रूट सध्या सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलियाचा नॅथन लायन सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे.

(Sports Latest News)

हेही वाचा : भारतीयांनी जगाला डिजिटल पेमेंट शिकवायची आलीये वेळ...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway traffic: मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांची महाकोंडी! पुण्याच्या दिशेने जाणारा मार्ग ठप्प, प्रवास ठरतोय शिक्षा!

Latest Marathi News Live Update : संस्थानासाठी ऐतिहासिक क्षण! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज शेगावला येणार

Pune News: वनविभागाच्या जमिनींची पडताळणी सुरू! पुणे जिल्ह्यात ‘एसआयटी’मार्फत तपासणी; सरकारला सादर करणार अहवाल, नेमंक काय कारण?

Maharashtra Weather Update : अवकाळी मुळे शेतकरी पुन्हा संकटात ! राज्यातील 'या' जिल्ह्यांत आजही पावसाचा इशारा

Satara Child Marriage: कुमारवयातच वाढतेय संसाराचे ओझे; प्रेमाच्या आड ‘छुप्या बालविवाहा’चे सातारा जिल्ह्यात वाढताहेत प्रकार, संकटाची चाहूल!

SCROLL FOR NEXT