Smriti Mandhana Shine India Womens Cricket Team Won
Smriti Mandhana Shine India Womens Cricket Team Won  esakal
क्रीडा

वर्ल्ड कप स्पर्धेत स्मृती मानधनानं सर केला 500 धावांचा टप्पा

सकाळ डिजिटल टीम

ICC Womens World Cup 2022 : दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या (South Africa Women) 'करो वा मरो' लढतीत भारतीय महिला संघ (India Women) पहिल्यांदा बॅटिंग करुन दक्षिण आफ्रिकेसमोर टार्गेट सेट करणार आहे. मिताली राजने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय भारतीय सलामी बॅटरनी सार्थ ठरवला. स्मृती मानधना (Smriti Mandhana) आणि शफाली वर्मा (Shafali Verma) यांनी प्रत्येक षटकात सरासरी 6 पेक्षा अधिक धावा करत संघाला दमदार सुरुवात करुन दिली. शफाली वर्मा अर्धशतकी खेळी करुन तंबूत परतली. रन आउटच्या रुपात तिने 53 धावांवर विकेट टाकली. स्मृती मानधनाने तिच्या साथीनं पहिल्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी केली. दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या लढतीत स्मृती मानधाने खास विक्रमाला गवसणी घातली. वर्ल्ड कप स्पर्धेत भारताकडून 500 धावांचा टप्पा पार करण्याचा पराक्रम तिने आपल्या नावे केला.

स्मृती मानधनाने कर्णधार मिताली राजच्या (Mithali Raj) साथीनंही आश्वासक भागीदारी रचली. या दोघींनी तिसऱ्या विकेटसाठी संघाच्या धावसंख्येत 80 धावांची भर घातली. स्मृती मानधना न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत दुसरे शतक झळकावेल, असे वाटत असताना मसबता क्लास हिने तिची विकेट घेतली.

स्मृती मानधनाने 84 चेंडूत 71 धावांची खेळी केली. आपल्या या खेळीत तिने 6 चौकार आणि एक षटकारही खेचला. स्मृतीनं साखळी फेरीतील 7 सामन्यातील 7 डावात 46. 71 च्या सरासरीनं 327 धावा केल्या आहेत. एका शतकासह भारताकडून ती सर्वाधिक धावा करणारी बॅटर असून स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या बॅटरमध्ये ती चौथ्या स्थानावर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

Latest Marathi News Live Update : प्रज्वल रेवण्णा प्रकरणी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची SIT सोबत बैठक

SCROLL FOR NEXT