Imran Khan  1992 World Cup Story Of Cornered Tigers T Shirt
Imran Khan 1992 World Cup Story Of Cornered Tigers T Shirt  Esakal
क्रीडा

PAK vs ENG : जखमी वाघ, पांढरा टी शर्ट अन् इम्रान खान! काय आहे 1992 च्या वर्ल्डकपची कहानी?

अनिरुद्ध संकपाळ

Imran Khan 1992 World Cup Story Of Cornered Tigers T Shirt : टी 20 वर्ल्डकप 2022 च्या पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील फायलन सामना काही तासांवर आला आहे. दरम्यान, या पाकिस्तान इंग्लंड यांच्यातील या अंतिम सामन्याचा संदर्भ 1992 मध्ये पाकिस्तानने जिंकलेल्या वनडे वर्ल्डकप फायलनशी जोडला जात आहे. त्यावेळी देखील साखळी फेरीतील खेळ पाहून पाकिस्तानचा संघ फायलनमध्ये पोहचेल असे कोणाला वाटले नव्हते. मात्र पाकिस्तानने फायनल गाठत वर्ल्डकपवरही नाव कोरले. दरम्यान, त्यावेळी वर्ल्डकप विजेत्या संघाचे कर्णधार इम्रान खान यांची एक गोष्ट खूप चर्चेत आली होती. इम्रान खान ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या सामन्यावेळी जखमी वाघाचे चित्र असलेला टी शर्ट घालून नाणेफेकीला आले होते. हा त्यांचा लकी टी शर्ट होता असे त्यांनी सांगितले. मात्र या टी शर्टमागे एक संदेश देखील होता.

सहसा दोन्ही देशाचे कर्णधार हे आपल्या देशाचा अधिकृत टी शर्ट किंवा ब्लेझर घालूनच नाणेफेकीसाठी मैदानात उतरतात. मात्र इम्रान खान हे 1992 च्या वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा अधिकृत टी शर्ट न घालता पांढऱ्या रंगाचा वाघाचे चित्र असलेला टी शर्ट घालून मैदानात उतरले होते. याबाबत बोलताना इम्रान खान म्हणाले होते की मी संघाला जखमी वाघासारखे खेळण्याचा सल्ला दिला होता. वाघ याच स्थितीत खूप धोकादायक असोत. असेही ते म्हणाले होते.

त्यावेळी पाकिस्तान संघाची परिस्थिती देखील तशीच होती. त्यांनी आपल्या पाच सामन्यापैकी फक्त 1 सामना जिंकला होता. त्यांना सेमी फायनल गाठण्यासाठी उर्वरित सर्व सामने जिंकणे गरजेचे होते. ही मोहिम ऑस्ट्रेलियापासून सुरू होत होती. त्यानंतर पाकिस्तानने जखमी वाघाप्रमाणे त्वेषाने खेळ करत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला होता.

जखमी वाघाचे चित्र असलेला टी शर्ट घालून आलेल्या इम्रान खान यांनी नाणेफेकीस मैदानावर पाऊल ठेवले तेव्हापासून पाकिस्तानने जोरदार बाऊन्स बॅक केला. यानंतर इंग्लंडविरूद्धच्या अंतिम सामन्यात देखील इम्रान खान यांनी पुन्हा तो जखमी वाघाचा फोटो असलेला टी शर्ट घातला होता. यावेळी देखील याच टीशर्ट बाबत त्यांना विचारण्यात आल्यावर त्यांनी 'संघ जर वाघासारखा खेळला तर मला जिंकला हरलो ती काही फरक पडत नाही.' असे उत्तर दिले होते.

पाकिस्तानने इंग्लंडचा पराभव करत 1992 ला आपला पहिला वर्ल्डकप जिंकला. इंग्लंडची शेवटची विकेट कर्णधार इम्रान खान यांनी घेतली होती. त्यानंतर 39 वर्षाच्या इम्रान खान यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तेव्हापासून हा पाकिस्तानचा वर्ल्डकप विजेता संघ जखमी वाघ म्हणून ओळखला जाऊ लागला.

योगायोगाची गोष्ट म्हणजे तब्बल 30 वर्षानंतर 1992 च्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची संधी पाकिस्तान संघाकडे आहे. ती वर्षापूर्वी पाकिस्तानने मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवरच इंग्लंडचा पराभव केला होता. आताही टी 20 वर्ल्डकप 2022 चा फायनल सामना हा पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातच होणार आहे. तोही ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट मैदानावर. त्यामुळे बाबर आझमचा संघ इतिहासाची पुनरावृत्ती करणार का याची उत्सुकता लागून राहिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramesh Chennithala : मतदारांचा कल ‘इंडिया’ आघाडीकडे

Loksabha Election 2024 : मोदी, ठाकरे, गांधी, पवार यांचीच हवा

Election Commission : निवडणूक आयोगाकडून तंत्रज्ञानस्नेही कारभाराला प्राधान्य

Devendra Fadnavis : कल्याण-मुरबाड रेल्वेमार्ग नगरपर्यंत नेणार

Success Story : पोरीची जिद्दच लय मोठी! अपघातात हात गमावला तरी अनामता डगमगली नाही, बोर्डात मिळवले ९२ टक्के मार्क्स

SCROLL FOR NEXT