Ind vs Aus Final 2023 Laser Show Kolhapur esakal
क्रीडा

Ind vs Aus Final : जगात भारी, आम्ही कोल्हापुरी! फायनल सामन्यात मोदी स्टेडियमवर घुमणार कोल्हापूरचा Laser Show

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत (World Cup Cricket Tournament) कोल्हापूरचे लेसर शो (Kolhapur Laser Show) होणार आहे.

सुयोग घाटगे

भारत हा विश्वचषक उंचावण्यापासून केवळ एक विजय दूर आहे. हा क्षण टिपण्यासाठी लाखो प्रेक्षक मैदानावर (Narendra Modi International Stadium Ahmedabad) येणार आहेत.

कोल्हापूर : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत (World Cup Cricket Tournament) कोल्हापूरचे लेसर शो (Kolhapur Laser Show) होणार आहे. जगातील सर्वात मोठे स्टेडियम असणाऱ्या नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय स्टेडियम अहमदाबाद (गुजरात) येथे सामन्यादरम्यान व नंतर या लेसर शो व लाईट इफेक्टचे खास आकर्षण असणार आहे.  

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा उत्साह टिपेला आहे. भारत हा विश्वचषक उंचावण्यापासून केवळ एक विजय दूर आहे. हा क्षण टिपण्यासाठी लाखो प्रेक्षक मैदानावर (Narendra Modi International Stadium Ahmedabad) येणार आहेत. याच प्रेक्षकांना अधिक आनंद देण्यासाठी मैदानावर खास लेसर शो व लाईट इफेक्ट करण्यात येतात. सामन्याच्या दुसऱ्या टप्प्यात अंधार पडल्यानंतर या लेसरची खरी जादू सुरू होते.

डिम शो व ग्राफिक शो सादर केला जातो. हाच शो कोल्हापूरचे तरुण अख्ख्या जगाला दाखवणार आहेत. देशभरात दिल्लीनंतर कोल्हापूरमध्ये तेही फक्त दोघांकडेच असणाऱ्या खास लेसर ने. अमित पाटील व रामकृष्ण वागराळे अशी या तरुणाची नावे आहेत. २०११ ला सुरू केलेल्या लाईटच्या व्यवसायात त्यांनी नवनवे तंत्रज्ञान स्वीकारत जगभरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Laser show of Kolhapur

अहमदाबाद येथील होणाऱ्या क्रिकेटच्या फाइनल मॅचसाठी दिल्ली येथील हेड वे क्रिएशन या कंपनीसोबत हा शो सादर केला जाणार आहे. यासाठी ६० वॅट या क्षमतेचे ४० लेसर लावण्यात येणार आहेत. हा एक विक्रम असून यापूर्वी कधीही एका वेळेला मैदानावर ४० लेसर कार्यान्वित केलेले नाहीत. या लेसर शो साठी योगेश चौधरी, अमित पाटील (अमित पाटील लाईट्स), रामकृष्ण वागराळे (आर.के.लेझर्स), सागर पाटील, अभिषेक हांडे, रोहित कदम, उदय साळोखे, विनोद हाजुराणी, रवीकुमार, गणेश तटकरे यांची टीम मैदानावर कार्यरत आहे.  

Laser show of Kolhapur

अयोध्येसह उज्जैन येथे शो

यापूर्वी अयोध्या येथे दिवाळीसाठी राम मंदिर परिसरामध्ये तसेच उज्जैन येथील महाकाल मंदिर येथे कोल्हापूरच्या या खास लेसर लाईट वापरून शो करण्यात आला आहे. तसेच दुबई येथे झालेल्या लग्न समारंभामध्ये ६० लेसर लावण्यात आले होते. 

‘विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात तेही भारतीय संघ हा सामना खेळत असताना कोल्हापूरचा लेसर शो होणार हे खूप आनंद देणारे आहे. प्रेक्षकांसाठी हा शो अविस्मरणीय ठरेल, याची ग्वाही आम्ही देतो.

-अमित पाटील,  रामकृष्ण वागराळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RJD Candidate Arrested : उमेदवारी अर्ज दाखल करताच 'राजद'च्या उमेदवारास झारखंड पोलिसांनी केली अटक!

Deglur Accident : बस व ट्रॅव्हल्स समोरासमोर अपघात २८ जण गंभीर जखमी, लेंडी पुला जवळील घटना; २ तास वाहतूक खोळंबंली

'२०२७ वनडे वर्ल्ड कप जिंकायचा असेल, तर आगरकर - गंभीरला पदावरून हटवा!', Navjot Singh Sidhu खरंच असं म्हणाले? स्वत:च केला खुलासा

Diwali Celebration : ऑपरेशन पहाट; सोलापूर पोलिसांनी पारधी कुटुंबांसोबत साजरी केली दीपावली, शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

Actor Asrani Passes Away : ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचं निधन, ८४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड

SCROLL FOR NEXT