कर्णधार रोहित टीम इंडियातुन 'त्या' खेळाडूचा करणार पत्ता कट ? ind vs aus test kuldeep yadav-not-gets-chance  
क्रीडा

IND vs AUS: संघात राजकारण! कर्णधार रोहित 'या' खेळाडूचा टीम इंडियातून करणार पत्ता कट?

त्या दिग्गज खेळाडूची क्रिकेट कारकिर्दी बहुतांश वेळ बेंचवर बसून पाणी पिण्यात देण्यात जात आहे....

Kiran Mahanavar

India vs Australia Test Series : भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॉर्डर गावसकर चार सामन्यांची मालिका खेळत आहे. टीम इंडियाचा असा एक खेळाडू आहे, ज्याला भारतीय क्रिकेट संघात चांगली कामगिरी करूनही संधी दिली जात नाही. कर्णधार रोहित शर्माने त्याला नागपुरात खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली नाही. कारण तो टीम इंडियातील राजकारणाचा बळी पडला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात रोहित शर्माने या खेळाडूला भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर करून वादाला तोंड फोडले. टीम इंडियाचा 'चायनामन' फिरकीपटू कुलदीप यादव टीम इंडियातील राजकारणाचा बळी ठरला आहे.

बांगलादेशविरुद्धच्या शेवटच्या कसोटी सामन्यात कुलदीप यादवला 'मॅन ऑफ द मॅच'चा पुरस्कार देण्यात आला. कुलदीप यादवने या सामन्यात एकूण 8 बळी घेतले आणि पहिल्या डावात उपयुक्त 40 धावा केल्या, ज्यामुळे भारताने बांगलादेशविरुद्धची पहिली कसोटी 188 धावांनी जिंकली. यानंतर पुढच्याच सामन्यात कुलदीप यादवला वगळण्यात आले.

भारतीय संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयावर क्रिकेटच्या सर्व दिग्गजांपासून चाहत्यांनीही प्रश्न उपस्थित केले आहेत. तेव्हापासून आतापर्यंत कुलदीप यादवला कसोटी संघात पुनरागमन करता आलेले नाही. कुलदीप यादवने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील बहुतांश वेळ बेंचवर बसून पाणी पिण्यात देण्यात जात आहे.

कुलदीप यादवला ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन, अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांच्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले आहे.

कुलदीप यादवने आतापर्यंत भारतासाठी 8 कसोटी सामन्यांमध्ये 34 विकेट घेतल्या आहेत, ज्यामध्ये त्याने 3 वेळा एका डावात 5 विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. एवढा चांगला रेकॉर्ड असतानाही कुलदीप यादवला ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा यांच्यामुळे कसोटी संघाबाहेर राहावे लागले.

भारताला घरच्या मैदानावर कसोटी सामन्यासाठी तीन फिरकी गोलंदाजांची गरज असताना टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कुलदीप यादवची निवड करण्यात आली आहे. कसोटी संघात रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांच्यामुळे बहुतेक वेळा कुलदीप यादवकडे दुर्लक्ष झाले आहे. एकदिवसीय आणि टी-20 संघातही अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजा यांच्यामुळे कुलदीप यादवला खेळण्याची संधी दिली जात नाही, कारण कुलदीप यादवची फलंदाजी या सर्व खेळाडूंपेक्षा थोडी कमी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT