WTC Final 2023 sakal
क्रीडा

WTC Final 2023 : भारत-ऑस्ट्रेलिया WTC अंतिम सामना होणार रद्द? मोठे अपडेट आले समोर

Kiran Mahanavar

India vs Australia WTC Final 2023 : टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्याचवेळी ऑस्ट्रेलिया प्रथमच WTC फायनल खेळत आहे. 2021 WTC फायनलमध्ये टीम इंडियाला न्यूझीलंडकडून 8 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. अशा स्थितीत यावेळी संघ चॅम्पियन बनण्याच्या इराद्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मैदानात उतरणार आहे. दरम्यान एक मोठी माहिती समोर आली आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या WTC फायनल सामन्यावर पावसाचे सावट आहे. 7 ते 11 जून दरम्यान लंडनमध्ये हे मॅच होणार आहे. दरम्यान हवामानाचा वेध घेतल्यास पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी पाऊस पडण्याची शक्यता नाही, तर चौथ्या दिवशी पावसाची पूर्ण शक्यता आहे.

त्याचबरोबर पाचव्या दिवशीही हवामान पुन्हा स्वच्छ राहण्याचा अंदाज आहे. जर आपण राखीव दिवस म्हणजेच 12 जूनबद्दल बोललो तर या दिवशी देखील हवामान खुले राहील. हवामान असेच राहिल्यास सामना रद्द होणार नाही.

लंडनमधील हवामानाबद्दल बोलायचे झाले तर, सामन्याच्या चौथ्या दिवशीच पाऊस पडण्याची शक्यता आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी सुमारे 60 टक्के पाऊस अपेक्षित आहे. हवामान अहवालानुसार चौथा दिवस वगळता उर्वरित दिवसात पावसाची चिन्हे नाहीत. पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी पावसाची केवळ 1 टक्के शक्यता आहे, तर तिसऱ्या दिवशी पावसाची 4 टक्के शक्यता आहे. त्याच वेळी पाचव्या दिवशी 1 टक्के पाऊस अपेक्षित आहे.

2021 मध्ये खेळ झाला होता खराब

2021 मध्ये न्यूझीलंड आणि भारत यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात मुसळधार पाऊस पडला. सामन्याच्या पहिल्या दोन दिवसांत एकही चेंडू टाकता आला नाही. यानंतर राखीव दिवसासह एकूण 4 दिवस खेळ झाला. या सामन्यात न्यूझीलंड संघाने विजय मिळवला आणि भारताचा 8 गडी राखून पराभव करून संघ चॅम्पियन बनला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rehan Vadra vs Bikaner House Censorship : बिकानेर हाऊस प्रशासन आणि रेहान वाड्रा यांच्यात वाद; आंदोलनाची ७० हून अधिक छायाचित्रे हटवल्याने संताप

Water Tanker : पाणी टँकरची लूट थांबणार; पुणेकरांसाठी महापालिकेचे विशेष ॲप लवकरच सुरू होणार

Pune Grand Tour Competition : पुण्यात ७५ किलोमीटर लांबीचे नवे सायकल ट्रॅक उभारणार; महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांचे निर्देश

Record Breaking ENG vs SL Match : श्रीलंकेने ४३० धावांचे लक्ष्य पार केले, इंग्लंडला हरवले! इतिहास घडला, हॅरी ब्रूकचे द्विशतक व्यर्थ

Tibet Earthquake: विनाशकारी पुरानंतर तिबेटवर मोठे संकट! भूकंपाचे जोरदार धक्के; ७ रिश्टर स्केलचे हादरे बसताच...

SCROLL FOR NEXT