IND vs NZ t20 world cup 2022 
क्रीडा

T20 World Cup : टीम इंडियाचा आज न्यूझीलंडविरुद्ध सामना; कुठे पाहू शकता, जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

सराव लढतीत उसळत्या चेंडूंवर फलंदाजी करण्याचा अभ्यास महत्वाचा

Kiran Mahanavar

India vs New Zealand T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात महम्मद शमीला अखेरच्या षटकात गोलंदाजी देऊन डेथ ओव्हरचा प्रश्न भारतीय संघाने सोडवला. आता आज न्यूझीलंडविरुद्ध हूक आणि पूल फटक्यांवर कसे नियंत्रण राखायचे याचा अभ्यास भारतीयांना करावा लागणार आहे. ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेपूर्वी उद्या भारताचा दुसरा आणि अखेरचा सराव सामना होत आहे. या लढतीबरोबर सर्व तयारी पूर्ण करावी लागणार आहे.

डेथ ओव्हरमधील अपयश भारताला गेल्या अनेक सामन्यांत सतावत होते, अशात ऑस्ट्रेलियाविरुद्धची लढत अटीतटीच्या उंबरठ्यावर असताना अखेरचे षटक संघात प्रदीर्घ कालावधीनंतर पुनरागमन करत असलेल्या महम्मद शमीला देण्याची चाल कर्णधार रोहिने केली होती. शमीनेही तीन विकेट मिळवत विश्वास सार्थ ठरवताना स्वतःचाही आत्मविश्वास उंचावला होता.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या त्या सामन्यात भारताचे प्रमुख फलंदाज अधिक उसळी घेणाऱ्या चेंडूंवर बाद झाले होते. हूक आणि पूलच्या फटक्यांसह सीमारेषेवर झेल देण्याची चूक करण्यात आली होती. उद्याचा न्यूझीलंडविरुद्धचा सामना या कमकुवत बाजूचा अभ्यास करण्यासाठी मोलाचा ठरणार आहे.

कार्तिक की पंत

भारतीय संघ व्यवस्थापन रिषभ पंतऐवजी दिनेश कार्तिकला अधिक पसंती देत आहे. उद्याच्या सामन्यात पंतलाही संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा सराव सामना 19 ऑक्टोबर रोजी ब्रिस्बेनच्या गाबा स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. दोघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरू होईल.

थेट प्रक्षेपण तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 विश्वचषक सराव सामना पाहू शकता. त्याच वेळी तुम्ही डिस्ने प्लस हॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर या सामन्याचा आनंद घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : विधेयक राष्ट्रविरोधी, सत्ता मिळवण्याचा प्रयत्न - राहुल गांधींचा हल्लाबोल

फक्त 50 रुपये दंड ! प्राण्यांविरुद्धच्या अत्याचारांवर अभिनेत्री पूजा सावंत व्यक्त "मी पोलीस ऑफिसर असते तर"

Bhooth Bangla X Review: कसा आहे अक्षय कुमारचा 'भूत बंगला'? ट्विटरवर लोकांनी कुंडली मांडली, म्हणाले- हे तर...

Walmik Karad Video: अजूनही पायात चप्पल नाही... वर्षभरानंतर वाल्मिक कराडचा व्हिडीओ आला; प्रकृती बिघडली

'स्वामींची कृपा असेल की, मी तिला...' थोडक्यात वाचली होती क्रांती रेडकर, केदार शिंदे जत्रा सिनेमाचा प्रसंग सांगताना म्हणाले...

SCROLL FOR NEXT