ind vs pak india win virat kohli
ind vs pak india win virat kohli sakal
क्रीडा

Ind vs Pak : विराट तुसी ग्रेट हो...! टीम इंडियाचा जल्लोष... विजयाचा 'हा' व्हिडिओ चुकवू नका!

Kiran Mahanavar

Ind vs Pak : अखेरच्या चेंडूपर्यंत क्रिकेटचा सामना संपत नाही असे म्हणतात, पण या अखेरच्या चेंडूपर्यंत सामना स्वकर्तृत्वावर जिंकून देण्याची क्षमता असामान्य खेळाडूंमध्येच असते. किंग कोहली... चेस मास्टर असा नानाविध गुणांनी नटलेला विराट कोहली याच्यासारखा दुसरा खेळाडू नाही. अशक्य ते शक्य हे परिवर्तन करण्याची धमक आपल्या मनगटात किती प्रभावी आहे हे विराटने आज सिद्ध करून दाखवले.

ट्वेन्टी-२० विश्वकरंडकातील पाकिस्तानविरुद्धचा सामना. गत स्पर्धेत झालेल्या पराभवाच्या जखमा,पराभवाची आठवण करून देणाऱ्या होता. दुबईत घडले तेच आज मेलबर्नवर घडणार असे वाटत होते. रोहित- राहुल- सूर्या असे खंदे फलंदाज बाद झाले, पण एक खेळाडू जिगर हरला नव्हता; तो अर्थात विराट कोहली होता.

आवश्यक धावांची सरासरी १६ पर्यंत पोहचलेली. म्हणजेच अखेरच्या १८ चेंडूत ४८ धावांची गरज असे गणित, पण अशा परिस्थितीतही डोके शांत ठेवून परिस्थितीनुसार आणि तेही पाकिस्तानच्या क्षेपणास्त्रांवर षटकारांचा हल्ला करून विराटने केलेली खेळी त्याच्या आजवरच्या खेळीतील सर्वोत्तम होती... लाखो-करोडो क्रिकेटप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फेडणारीच होती. २०१६ च्या विश्वकरंडक स्पर्धेत मोहालीवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराटने ५१ चेंडूत नाबाद ८२ धावा करून सर्व क्रिकेटविश्वाला थक्क केले होते.

आजही त्याने तेवढ्याच ८२ धावा केल्या. त्यासाठी ५३ चेंडू घेतले, पण आज पाकिस्तान प्रतिस्पर्धी असल्याने ही खेळी अनमोल ठरली... आणि म्हणूनच एरवी कणखर असलेला विराट या खेळीनंतर भावूक झाला. डोळ्यांत आनंदाश्रू आले. डोळे घट्ट मिटून आकाशाकडे पाहत होता. एवढा भावूक मी कसा झालो, हे मलाही कळले नाही... विराट आपल्या भावनांना मोकळी वाट करून देत होता. त्याच वेळी कर्णधार रोहित शर्मा विराटला खांद्यावर घेऊन नाचत होता. जणू काही विश्वकरंडक जिंकल्याचाच आनंद मैदानावर साजरा होत होता. कारण विराटने जे शक्य नव्हते ते प्रबळ इच्छाशक्ती... कर्तृत्व आणि मनगटाच्या ताकदीवर करून दाखवले होते.

ICC ने शेअर केला व्हिडिओ

आयसीसीने टीम इंडियाचे भाव दर्शविणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये राहुल द्रविडला मिठी मारताच कोहलीने सुटकेचा श्वास घेतला. कोहलीने ती एक धाव घेताच खेळाडूंनी डगआउटमध्ये एकमेकांना मिठी मारण्यास सुरुवात केल्याचे व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे. राहुल द्रविड अतिशय आक्रमक शैलीत दिसला आणि खेळाडूंना हाय फाईव्ह देताना दिसला. त्याचवेळी कोहलीच्या चेहऱ्यावर सुटकेचा नि:श्वास स्पष्ट दिसत होता.

  • विराट कोहलीने रविवारी रोहित शर्माच्या टी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावांच्या (३,७४१ धावा) विक्रमाला मागे टाकले. विराटच्या आता ३,७९४ धावा झालेल्या आहेत.

  • विराट कोहलीने टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक १४ वेळा सामनावीराचा मान संपादन केला आहे. याआधी अफगाणच्या मोहम्मद नबी हा १३ वेळा सामनावीर बनला होता.

  • विराट कोहलीने शोएब मलिकच्या एका विक्रमाला गवसणी घातली. विराटने १८ वेळा नाबाद राहत संघाला विजय मिळवून दिले आहेत. शोएबनेही १८ वेळा नाबाद राहत पाकिस्तानला विजय मिळवून दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

New Zealand squad T20 WC24 : टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी संघाची घोषणा! 'हा' खेळाडू सांभाळणार कर्णधारपदाची धुरा

Israel-Hamas War: शस्त्रसंधीच्या चर्चा सुरू असतानाच इस्राइलने गाझामध्ये डागली क्षेपणास्त्रे; हल्ल्यात 13 जणांचा बळी, कित्येक जखमी

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

SCROLL FOR NEXT