shikhar dhawan
shikhar dhawan esakal
क्रीडा

टीम इंडियात मिळालेल्या डच्चू नंतर गब्बरची आली प्रतिक्रिया, 'निवडकर्त्यांना वाटलं असेल...

धनश्री ओतारी

भारतीय संघाची दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी घोषणा केली आहे. या संघात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे तर काही खेळाडूंचे पुनरागमन झालं आहे. अशातच टीम इंडियाचा गब्बर म्हणजेच शिखर धवनला संधी न दिल्याने क्रिकेट जगतात चर्चा रंगली आहे. दरम्यान, स्वतः शिखर धवनने संघ निवडीवर प्रतिक्रिया दिली आहे.

साऊथ अफ्रिकेविरुद्ध टी २० सीरिजसाठी उमरान मलिक आणि अर्शदीप सिंह यांसारख्या खेळाडूंना संधी दिली आहे. तर शिखर धवन, संजू सॅमसन, राहुल त्रिपाठी यांसारख्या खेळाडूंना डच्चू दिला आहे. आयपीएलमधील धवनची खेळी पाहता त्याची साऊथ अफ्रिकेविरुद्ध निवड होईळ असं वाटतं होत. पण त्याच्या पदरी निराशा पडली.

यावर शिखर म्हणाला, आपल्या जीवनात जे काम कराल त्यावर हृदयातून प्रेम करता आलं पाहिजेल. जेव्हा त्या कामात अडचण येईल. ते काम कधी काम वाटणार नाही. ते तुम्ही एन्जॉय कराल. आत्ताच्या पिढीला सर्व गोष्टी ताबडतोब हव्या असतात. पण माझ्या मते कोणत्या गोष्टी लगेच भेटत नसतात.

आत्ता मी ज्या ठिकाणी पोहचलो आहे ते शिखर गाठण्यासाठी मला ५ वर्ष नव्हे तर २५ वर्ष लागले आहेत. मी फक्त इतकच सांगू शकतो की जी काय जर्नी असेल ती एन्जॉय करा. जीवन खुप सुंदर आहे. त्याचा शोध चांगल्याप्रकारे करण गरजेच आहे. तुम्ही जिथं जाल तिथं आनंद पसरवता यायला हवा. अशी प्रतिक्रिया शिखरने व्यक्त केली.

तसेच मी एक पॉझिटीव्ह व्यक्ती आहे. गेल्या वर्षी भारतीय संघाची लीडरशीप करणे म्हणजे स्वप्न पूर्ण झाल्यासारखं आहे. निवडकर्त्यांना वाटलं असेल त्यांनी निवडलेले खेळाडू माझ्यापेक्षा चांगल्या प्रकारे खेळत असतील. आणि बरोबर आहे.

निवडकर्ते जो काही निर्णय घेतील त्याचा मला आदर आहे. जीवनात अनेक चढउतार येत असतात. आणि त्या गोष्टींचा स्विकार करायला हवा. आपण फक्त आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रीत करायला हवं. जे मी कंट्रोल करु शकतो. मला संधीचे फक्त सोनं करायच आहे. अशी भावना शिखरने यावेळी व्यक्त केली.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी रोहित शर्मा, विराट कोहली, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांना विश्रांती देण्यात आली आहे. त्याचवेळी अष्टपैलू हार्दिक पांड्याने पुनरागमन केले आहे.

या संघाचे नेतृत्व केएल राहुल करणार असून यात ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, व्यंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक यांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT