Gautam Gambhir on Comparison Between Virat Kohli And Sachin Tendulkar After a Century sakal
क्रीडा

IND vs SL: चर्चा तर होणारच! सचिन-विराट तुलनेवर गंभीरने केले रोखठोक वक्तव्य

सचिन विराटची होतेय तुलना, गौतमचं 'गंभीर' वक्तव्य! तुम्ही...

Kiran Mahanavar

IND vs SL, 1st ODI : टीम इंडियामध्ये रन मशीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्धच्या ODI मालिकेतील पहिल्या सामन्यात धडाकेबाज खेळी खेळली आणि वर्षातील पहिल्याच सामन्यात शतक झळकावले. आता कोहलीने शतक झळकावले आणि क्रिकेटचा देव म्हटल्या जाणार्‍या महान खेळाडू सचिन तेंडुलकरशी त्याची तुलना होत नाही हे दुर्मिळ आहे. (Gautam Gambhir on Comparison Between Virat Kohli And Sachin Tendulkar After a Century)

कोहलीने शतक झळकावताच कॉमेंट्री बॉक्सपासून सोशल मीडियाच्या व्यासपीठावर त्याची तुलना मास्टर ब्लास्टरशी करण्यात आली. लोकांमध्ये अशी चर्चा आहे की लवकरच विराट कोहली सचिनचा सर्वाधिक वनडे शतकांचा विक्रमही आपल्या नावावर करेल. मात्र विराट कोहलीची तुलना सचिन तेंडुलकरशी केल्यावर टीम इंडियाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर संतापला आहे.

कोहलीच्या खेळाचे कौतुक करताना गौतम गंभीर म्हणाला की, सचिनच्या काळात धावा काढणे अधिक कठीण होते, कारण त्यावेळी क्षेत्ररक्षणाचे नियम फलंदाजांना अनुकूल नव्हते, जे आज आहेत. भारताविरुद्ध श्रीलंकेची ही अत्यंत सोपी गोलंदाजी होती, ज्यामुळे टीम इंडियाची धावसंख्या 378 धावांपर्यंत पोहोचली.

स्टार स्पोर्ट्सशी संवाद साधताना गौतम गंभीर म्हणाला, 'ही गोलंदाजी अतिशय सामान्य होती. भारतीय फलंदाजी क्रमवारीतील अव्वल 3 फलंदाजांनी भरपूर धावा केल्या. रोहित आणि कोहली, शुभमन यांच्याकडेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इतक्या धावा करण्याची क्षमता आहे. आज रोहित आणि शुभमन धावा करत होते हे माझ्यासाठी आश्चर्यकारक होते.

या सामन्यात विराट कोहलीने कारकिर्दीतील 45 वे शतक झळकावले आणि त्याने सचिनच्या विक्रमाची बरोबरी केली. त्याचे हे सलग दुसरे वनडे शतक आहे. गेल्या महिन्यात त्याने बांगलादेशविरुद्ध चट्टोग्राममध्ये शतक झळकावले होते. एकूण वनडे शतकांच्या बाबतीतही कोहली आता सचिन तेंडुलकरपासून फक्त 4 शतके दूर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

Crime: पक्षातील सदस्याला अडकवण्यासाठी घरात स्फोटके आणि दारू ठेवली, पण काँग्रेस नेता स्वत:च अडकला अन्...; काय घडलं?

दुर्दैवी घटना! 'सख्ख्या काकाच्या पिकअपखाली सापडून चिमुरड्याचा मृत्यू'; आंबेगाव तालुक्यातील घटना, कुटुंबीयांचा आक्रोश

INDW vs PAKW सामन्यात वाद! पाकिस्तानी फलंदाज विकेटनंतरही मैदान सोडेना, कर्णधाराचीही अंपायरसोबत चर्चा; भारताचं मात्र सेलिब्रेशन

INDW vs PAKW, Video: पाकिस्तानचा पोपट झाला! जेमिमाहला रोड्रिग्सच्या विकेटसाठी सेलीब्रेशन करत होते अन् अचानक...

SCROLL FOR NEXT