ICC Test Rankings  esakal
क्रीडा

ICC Test Rankings : 'तांत्रिक बिघाड' नाही तर खरोखरच भारत अव्वल स्थानी विराजमान

अनिरुद्ध संकपाळ

ICC Test Rankings : आयसीसीच्या अधिकृत वेबसाईटने अनेकवेळा भारतीय संघाला कसोटी रँकिंगमध्ये अव्वल स्थानी बसवले होते. मात्र काही तासातच 'भाकरी फिरवत' आयसीसीने तांत्रिक कारणामुळे असं झालं म्हणत ऑस्ट्रेलियाच्या डोक्यावर मुकूट चढवला होता. मात्र आता वार्षिक रँकिंग अपडेटमध्ये खरोखरच भारताने ऑस्ट्रेलियाला मागे टाकत रोहित सेनेने आयसीसी कसोटी टीम रँकिंगमध्ये अव्वल स्थान पटकावले.

ऑस्ट्रेलियाची 15 महिन्याची कसोटी रँकिंगमध्ये अव्वल स्थान पटकावण्याची मक्तेदारी आज अखेर भारताने मोडून काढली. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलला जवळपास एक महिना राहिला असताना भारताने ऑस्ट्रेलियाला मागे टाकले.

वार्षिक आयसीसी रँकिंग अपडेटपूर्वी ऑस्ट्रेलिया 122 गुणांनी अव्वल स्थानावर होती. भारत 119 गुण घेऊन तीन गुणांनी पिछाडीवर होता. दरम्यान वार्षिक रँकिंग अपडेटमध्ये मे 2020 पासून ते मे 2022 पर्यंत पूर्ण झालेल्या सर्व मालिकांचा विचार केला जातो. या अपडेटमध्ये ऑस्ट्रेलियाने 2019 - 20 मध्ये झालेल्या मायदेशातील पाकिस्तानविरूद्धची मालिका 2-0 तर न्यूझीलंड विरूद्ध 3-0 अशी जिंकली होती.

मात्र त्या मालिका वार्षिक अपडेटमध्ये गणल्या जाणार नाहीत. तर त्यांनी 2021 - 21 मध्ये इंग्लंडविरूद्धची 4 - 0 ने जिंकलेली मालिका देखील पूर्णपणे पकडली गेली नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे आयसीसी टेस्ट रेटिंग 121 वरून 116 वर घसरले.

भारताचा विचार केला तर 2019 - 20 मध्ये न्यझीलंविरूद्धची कसोटी मालिका 2 - 0 ने गमावली होती. ही मालिका वार्षिक अपडेटमध्ये गणली जाणार नाही. त्यामुळे भारताचे गुण 119 वरून 121 झाले.

(Sports Latest News)

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup, IND vs USA: वानखेडेचं मैदान मारत भारतीय संघाची मोहिमेला विजयाने सुरुवात! अमेरिकेवर केली मात

Sarpanch Santosh Deshmukh : संतोष देशमुख हत्या प्रकरणात डिजिटल पुराव्यांची प्रत सादर

CM Devendra Fadnavis : राज्याच्या विकासाला नवे बळ; ‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ’मध्ये १०,८३१ कोटींचे करार

Indian Railways Fare Cut : रेल्वे प्रवाशांसाठी मोठा दिलासा! दहा गाड्यांचे तिकीट दर स्वस्त होणार

Police Jumbo Recruitment : पुणे पोलिसांत जम्बो भरती; १६३३ जागांसाठी १.३९ लाख अर्ज; तंत्रज्ञानाचा होणार वापर

SCROLL FOR NEXT