India vs Bangladesh World Cup Pune Weather Update sakal
क्रीडा

Ind vs Ban Weather Update : पुण्यातून मोठी अपडेट...! भारत-बांगलादेश सामन्यावर पावसाचे काळे ढग?

Kiran Mahanavar

India vs Bangladesh World Cup Pune Weather Update : भारत आणि बांगलादेश यांच्यात वर्ल्डकपमधला 17 वा सामना 19ऑक्टोबरला म्हणजे आज. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए) स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

2023 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारताने शानदार सुरुवात केली आहे. टीम इंडियाने पहिल्या तीन सामन्यांमध्ये शानदार विजय नोंदवला आहे. त्याचबरोबर बांगलादेशने आपल्या तीन सामन्यांपैकी फक्त एकच सामना जिंकला आहे. अशा परिस्थितीत पुण्यात सामन्यादरम्यान हवामान कसे असेल ते जाणून घेऊया.

भारत आणि बांगलादेश सामन्याच्या एक दिवस आधी पुण्यात पाऊस पडला आहे. 19 ऑक्टोबरलाही पाऊस पडण्याची शक्यता आहे का? याबाबत हवमानाचा अंदाज समोर आला आहे. भारत आणि बांगलादेश सामन्यादरम्यान पुण्यात हवामान स्वच्छ असेल.

Accuweather.com च्या मते, दिवसभरात काही ढग असू शकतात, परंतु केवळ 2 टक्के पाऊस अपेक्षित आहे. दिवसा खूप उष्णता असेल. कमाल तापमान 34 अंशांच्या आसपास तर किमान तापमान 23 अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत चाहत्यांना कोणत्याही व्यत्ययाशिवाय रोमांचक सामना बघायला मिळू शकतो.

पुण्याची खेळपट्टी कशी असेल?

पुण्यातील एमसीए स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल मानली जाते. या मैदानावर आतापर्यंत 7 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. त्यात, संघांनी 8 वेळा 300 हून अधिक धावा केल्या आहेत. अशा परिस्थितीत येथे उच्च स्कोअरिंग सामना पाहायला मिळेल. या खेळपट्टीवर फिरकीपटूंनाही भरपूर फायदा होतो, पण ही खेळपट्टी गोलंदाजांना फारशी मदत करत नाही.

भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन/शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pravin Gaikwad: प्रकाश आंबेडकर, वामन मेश्राम, पुरुषोत्तम खेडेकर टार्गेटवर; प्रवीण गायकवाड यांचा धक्कादायक आरोप

Income Tax: 24 तासांत मिळतोय ITR रिफंड, आजच फाईल करा... उद्या बँक खात्यात पैसे जमा, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Beed : ज्ञानेश्वरी मुंडेंनी केलं विषप्राशन, बेशुद्धावस्थेत नेलं रुग्णालयात; १८ महिन्यांपासून पतीचे मारेकरी मोकाट, अटकेची मागणी

Latest Maharashtra News Updates : राज ठाकरेंनी संविधान वाचाव- उत्तर प्रदेशचे मंत्री ओम प्रकाश राजभर

स्वतः इंग्लिश मीडियममध्ये शिकला, ख्रिश्चन बायको केली आणि आता... बिग बॉस फेम रीलस्टारची रितेश देशमुखवर टीका

SCROLL FOR NEXT