Ravindra Jadeja
Ravindra Jadeja  Sakal
क्रीडा

VIDEO : बोल्ड झाल्यावर जाडेजा स्वत:वरच चिडला!

सुशांत जाधव

साउदीनं रविंद्र जाडेजाचा खेळ खल्लास केला

India vs New Zealand 1st Test Day 2 : कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर सुरु असलेल्या पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात भारतीय संघाने 345 धावा केल्या. श्रेयस अय्यरच्या शतकी खेळीसह शुबमन गिल आणि रविंद्र जाडेजा यांच्या अर्धशतकामुळे टीम इंडियाला हा पल्ला गाठता आला. पहिल्या दिवशी श्रेयस अय्यरला उत्तम साथ दिलेल्या जाडेजाला दुसऱ्या दिवशी आल्या पावली माघारी परतावे लागले. पहिल्या दिवसाअखेरच जाडेजाने अर्धशतक पूर्ण केले होते. यात त्याला दुसऱ्या दिवशी एकाही धावेची भर घालता आली नाही. साउदीच्या गोलंदाजीवर तो बोल्ड झाला. आउट झाल्यानंतर चेंडू ओळखण्यात चूक झाल्याचे जाडेजाच्या लक्षात आले. त्यामुळेच आपल्या चुकीच्या फटक्यावर तो नाराजी व्यक्त करताना दिसला.

कर्णधार अजिंक्य रहाणे आणि पुजारा स्वस्तात माघारी फिरल्यानंतर डाव सावरण्याची जबाबदारी श्रेयस अय्यरच्या खांद्यावर येऊन पडली होती. त्याने पदार्पणातील सामन्यात आपल्यातील क्षमता सिद्ध करुन संघाला अडचणीतून बाहेर काढले. श्रेयस अय्यरला जाडेजाने दुसऱ्या बाजूने उत्तम साथ दिली. दोघांनी पाचव्या विकेटसाठी 121 धावांची भागीदारी रचली. त्यामुळे भारतीय संघाचा पहिला डाव सावरला. दुसऱ्या दिवशीच्या खेळात जाडेजा आणखी काही उपयुक्त धावा करेल असे वाटले होते. पण साउदीने त्याला एकही धाव न करता तंबूत धाडले.

कानपूरच्या पहिल्या कसोटी सामन्यात श्रेयस अय्यरच्या खेळीच्या जोरावर टीम इंडियाने पहिल्या डावात 345 धावा केल्या आहेत. सलामीवीर शुबमन गिलने 93 चेंडूत 52 धावांची खेळी केली. तर रविंद्र जाडेजाने 112 चेंडूचा सामना करताना 50 धावा केल्या. तळाच्या फलंदाजीत रविचंद्रन अश्विनने 38 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. न्यूझीलंडकडून टिम साउदीनं सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. कायले जेमिसनला 3 तर फिरकीपटू अजाझ पटेलनंही 2 विकेट घेतल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT