India Vs West Indies 2nd ODI Virat Kohli Fan Wave Posters In Support Of King Kohli esakal
क्रीडा

WI vs IND : राजा हा राजाच असतो; विंडीजविरूद्धच्या 2nd ODI मध्ये झळकलं 'विराट पोस्टर'

अनिरुद्ध संकपाळ

त्रिनिदाद : भारत आणि वेस्ट इंडीज (India Vs West Indies) यांच्यात दुसरा वनडे सामना (2nd ODI) सुरू आहे. विंडीज विरूद्धच्या वनडे मालिकेत भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली आहे. मात्र या स्टार खेळाडूंना त्याच्या चाहत्यांनी मात्र विश्रांती दिलेली नाही. भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) विंडीजमधील मालिका खेळत नाहीये. मात्र त्याचे चाहते त्याला वेस्ट इंडीजमध्ये मिस करत आहेत. अशाच एका चाहत्याने दुसऱ्या वनडे दरम्यान एक पोस्टर झळकवले. सध्या हे पोस्टर सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

या चाहत्याने (Virat Kohli Fan) आपल्या हातात घेतलेल्या पोस्टरवर 'विराट कोहली तुला आम्ही मिस करतोय. राजा हा राजाच असतो.' असा मजकूर लिहिला होता. या पोस्टरद्वारे चाहत्याने विराट कोहलीला पडत्या काळात आपला खंबीर पाठिंबा दर्शवला आहे. विराट कोहली सध्या खराब फॉर्ममधून जात आहे. मात्र त्याचे चाहते अशा परिस्थितीतही त्याला पाठिंबा देत आहेत.

विराट कोहली वेस्ट इंडीज दौऱ्यावर तीन वनडे आणि पाच टी 20 सामन्यांची मालिका खेळण्यासाठी आलेल्या भारतीय संघात नाहीये. तो आता आशिया कप टी 20 स्पर्धेत भारतीय संघात परतेल अशी आशा आहे. विराट कोहलीने इंग्लंड विरूद्धच्या 2 वनडे सामन्यात फक्त 33 धावा केल्या आहेत. तर टी 20 मालिकेतील दोन सामन्यात 12 धाा केल्या. विराट कोहलीने एजबेस्टन कसोटीत देखील दोन्ही डावात 31 धावाच केल्या होत्या. दोन वर्षे उलटून गेली तरी विराट कोहलीच्या बॅटमधून शतकी खेळी निघालेली नाही.

विराट कोहलीने विश्रांती घेतली. तो विंडीज दौऱ्यावर खेळणार नाही म्हटल्यावर त्याच्यावर टीकेची झोड उठली होती. भारताचे माजी कर्णधार कपिल देव आणि सुनिल गावसकर यांनी या निर्णयावर आक्षेप घेतला होता. आता भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर देखील म्हणाले की, 'विराट कोहलीला विश्रांती देऊन एक चुकीचा संदेश देण्यात आला आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thailand Pub Fire : पबमध्ये मध्यरात्री भीषण अग्नितांडव, २७ जणांचा होरपळून मृत्यू, ६३ गंभीर जखमी; दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ समोर

Constitutional Amendment India: मंत्रिपदावरून हटविण्याऐवजी निलंबन;प्रस्तावित १३०व्या घटनादुरुस्ती विधेयकाबाबत संसदीय समितीची शिफारस

शेतकऱ्यांना ३१ जुलैपूर्वी कर्जमाफी! ३ टप्प्यात कर्जमाफी, १५ लाख शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा होणार; पहिल्यांदा कर्जमाफी कोणाला? निकष काय बदलले, वाचा सविस्तर...

अर्थवेध : भारतीय गुंतवणूकदारांचा विजय; ‘एफआयआय’ युगाचा अस्त?

ढिंग टांग : वैशाखनंदन संवाद..!

SCROLL FOR NEXT