Indian Men's Hockey Team coach Graham Reid resigned ESAKAL
क्रीडा

Indian Men's Hockey Team : वर्ल्डकप पराभवानंतर हॉकी इंडियात मोठी खळबळ; प्रशिक्षकांनी दिला राजीनामा

अनिरुद्ध संकपाळ

Indian Men's Hockey Team coach Graham Reid resigned : मायदेशात झालेल्या हॉकी वर्ल्डक 2023 मध्ये भारताच्या पुरूष हॉकी संघाचे क्रॉस ओव्हरमध्येच आव्हान संपुष्टात आले. यानंतर पुरूष हॉकी संघात मोठी घडामोड घडली आहे. संघाचे प्रमुख प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. रीड यांची भारतीय हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी एप्रिल 2019 मध्ये नियुक्ती झाली होती. त्याच्या मार्गदर्शनाखाली भारताने टॉकियो ऑलिम्पिक 2021 मध्ये कांस्य पदक पटकावले होते.

ऑस्ट्रेलियाच्या 58 वर्षीय ग्रॅहम रीड यांनी आपला राजीनामा हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की यांच्याकडे सुपूर्द केला आहे. रीड यांनी राजीनामा देताना सांगितले की, 'आता पदावरून पायउतार होण्याची आणि नव्या व्यवस्थापकाकडे कार्यभार सोपवण्याची वेळ आली आहे.'

ते पुढे म्हणाले की, 'भारतीय संघासोबत आणि हॉकी इंडियासोबत काम करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. मी या ऐतिहासिक प्रवासाचा प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला. मी संघाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Officer : संघाच्या पथसंचलनात सहभागी झालेल्या आणखी एका सरकारी कर्मचाऱ्यावर कारवाई; वैद्यकीय अधिकाऱ्याला केलं निलंबित

Neeraj Chopra : 'गोल्डन बॉय' नीरजची भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट कर्नल पदावर नियुक्ती, Video

"त्याने मला विचित्र पद्धतीने स्पर्श केला" पारुने सांगितला तिला आलेला वाईट अनुभव "सहन करायचं नाही मारायचं.."

Latest Marathi News Live Update : आमदार रवी राणांचा बच्चू कडूंवर पुन्हा गंभीर आरोप

Mumbai Water Supply: जलवाहिन्यांच्या दुरुस्‍तीसाठी ५.१७ कोटींचा प्रकल्प, वर्षभरात काम पूर्ण होणार!

SCROLL FOR NEXT