Team-India-Tiktok 
क्रीडा

INDvsNZ : 'डान्स लाईक चहल'; टीम इंडियातील खेळाडूंचा टिकटॉक व्हिडिओ व्हायरल!

सकाळ डिजिटल टीम

INDvsNZ : भारतीय संघ सध्या टी-20 विजयाचा जल्लोष साजरा करत आहे. न्यूझीलंडला व्हाईटवॉश दिल्याने टीम मेंबरसह क्रिकेट फॅन्स सगळेच जाम खूश आहेत.

टी-20 मालिकेत व्हाईटवॉश, सुपर ओव्हर, रोहित शर्मा, विराट कोहली, के. एल. राहुल यांनी केलेली कामगिरी याची चर्चा सुरू असतानाच आता टीम इंडियाचा आणखी एका खेळाडू सध्या चर्चेत आला आहे. फिरकीपटू युझवेंद्र चहलचा एक व्हिडिओ सोशल मीडियात सध्या तुफान व्हायरल होत आहे.

इतर खेळाडूंप्रमाणेेच युझवेंद्र चहल सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टिव्ह असतो. आपले अनेक फोटो, व्हिडिओ तो त्याच्या ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाउंटवरून पब्लिश करत असतो. आताही त्याने पब्लिश केलेल्या एका टिकटॉक व्हिडिओची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. 

अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये चहल टीम इंडियातील त्याच्या इतर टीम मेंबरसोबत नाचताना दिसत आहे. चहलसोबत श्रेयस अय्यर आणि शिवम दुबे यांनी ताल धरला आहे. त्यांचा हा अफलातून डान्स बघून अनेक क्रिकेट फॅन्सनी कमेंटचा वर्षाव केला आहे. काही नेटकऱ्यांनी तर चहलला डान्स शोसाठी ऑडिशन देण्याचा सल्ला दिला आहे. 

या व्हिडिओमध्ये एकूण चारजण दिसत असून त्यापैकी एकाने आपला चेहरा झाकला आहे. हा खेळाडू रोहित शर्मा आहे की अजून दुसरा कोण? याबाबत अनेकांनी प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. पण, तो खेळाडू रोहितच असल्याचे अनेक नेटकऱ्यांचे मत आहे.

दरम्यान, रविवारी झालेल्या अखेरच्या सामन्यावेळी 'मलंग' या बॉलिवूड मूव्हीची स्टार कास्टही प्रमोशनसाठी स्टार स्पोर्ट्सच्या स्टुडिओमध्ये दाखल झाली होती. यावेळी अभिनेते अनिल कपूर, आदित्य रॉय कपूर, दिशा पटानी यांनीही 'डान्स लाईक चहल' चॅलेंज स्वीकारत 'चहल डान्स' केला. 

मॅच संपल्यानंतरही चहल आणि श्रेयस अय्यर यांनी मैदानावर तीच डान्सस्टेप करत विजयाचा आनंद साजरा केला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: ‘आमदारगिरी’चा बनाव तरुणाच्या अंगाशी! पुण्यात ऑडीवर लावलं 'आमदार' स्टिकर, मद्यधुंद अवस्थेत कार पळवणाऱ्या २३ वर्षीय तरुणाला घेतलं ताब्यात

Nandigram Express : नंदिग्राम एक्स्प्रेस चुकीच्या रुळावर लोको पायलटच्या सतर्कतेने अनर्थ टळला, किनवट स्थानकावर दोन तास खोळंबा

Latest Marathi News Update : मराठा समाजाला न्याय द्या, पण ओबीसींचे वाटोळे सरकारने केले विजय वडेट्टीवार यांचा घणाघात

Japan's Population: ११४ वर्षांच्या आजी अन् ११२ वर्षांचे आजोबा! काय आहे जपानमधील नागरिकांच्या दीर्घायुष्याचे रहस्य?

MPSC Success Story: एक एकर शेती, आई-वडिलांची मजुरी अन् पूजाची जिद्द; चौथ्या प्रयत्नात MPSC परीक्षेत महसूल सहाय्यकपदी यश, जिद्दीची यशोगाथा

SCROLL FOR NEXT