Smith-INDvsAUS 
क्रीडा

INDvsAUS : स्मिथच्या शतकी खेळीने ऑस्ट्रेलियाला तारले; भारतापुढे 287 धावांचे आव्हान

सकाळ डिजिटल टीम

बंगळूर : ऑस्ट्रेलियाचा तुफान फलंदाज स्टीव्ह स्मिथने भारतीय गोलंदाजांचा टिच्चून सामना करत शतकी खेळी साकारली. याच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारतापुढे 287 धावांचे आव्हान उभारले आहे.

तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली आणि कर्णधार अॅरॉन फिंचने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांची सुरवात खराब झाली. सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचा अडथळा मोहम्मद शमीने दूर करत भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेला स्टिव्ह स्मिथ आणि कर्णधार अॅरॉन फिंच ही जोडी जमताना दिसत होती. मात्र, चोरटी धाव घेण्याच्या नादात उडालेल्या गोंधळाने फिंचचा बळी घेतला. जडेजा आणि मोहम्मद शमीने त्याला रण आउट केले. 

त्यानंतर चौथ्या क्रमांकावर आलेल्या लबुश्चेंगने स्मिथच्या जोडीने डावाला आकार दिला. अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर त्याला जास्त काळ मैदानावर तग धरता आला नाही. जडेजाने टाकलेल्या एका चेंडूवर कर्णधार विराट कोहलीने त्याचा अफलातून कॅच पकडला. लबुश्चेंगने 64 चेंडूत 5 चौकारांच्या साहाय्याने 54 धावांची खेळी केली. 

स्टीव्ह स्मिथने एका बाजूने किल्ला लढता ठेवला होता.  त्याने शतक पूर्ण केल्यानंतर मोठे फटके खेळण्यास सुरवात केली. या खेळीदरम्यान त्याने 4000 धावांचा टप्पाही गाठला. मात्र, या नादात तो बाद झाला. 132 चेंडूत 131 धावांची शतकी खेळी केली. यामध्ये 14 चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. 

स्मिथ बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे एका पाठोपाठ एक फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेले. शेवटी 50 षटकांत कांगारुंची मजल 286 धावांपर्यंत पोहोचली. त्यांनी टीम इंडियापुढे 287 धावांचे आव्हान ठेवले आहे. टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवन जायबंदी झाल्याने टीम इंडियापुढे पेच निर्माण झाला आहे. मात्र, आता टीम इंडिया याचा कसा सामना करते ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Police Van Accident : पुण्यात धक्कादायक अपघात! पोलीस व्हॅनने उडवल्या ७ गाड्या; CCTV व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : नागपुरात E20 विरोधात गडकरींच्या घरासमोर युवक काॅंग्रेस आक्रमक

Chandrakant Patil: मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये दैवी गुण, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून कौतुक

Pune News: पुणेकरांनो, अजून किती वाट पाहणार? PMRDA चे ३,९०६ कोटींचे प्रकल्प अजूनही रखडले, घोषणा फक्त कागदावरच..

Engineering CAP Result: इंजिनिअरिंग प्रवेशाची पहिली यादी जाहीर; १६ हजार विद्यार्थ्यांना पहिल्याच पसंतीचे कॉलेज! जाणून घ्या महत्त्वाच्या पायऱ्या

SCROLL FOR NEXT