Gill-Shaw 
क्रीडा

INDvsNZ : विस्कटलेली घडी सुधारण्याची संधी; शॉ आणि गिलवर राहणार लक्ष!

सुनंदन लेले

हॅमिल्टन : न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी एकदिवसीय मालिकेत झालेल्या चुका सुधारण्याची संधी उद्यापासून भारतीय संघाला मिळणार आहे. न्यूझीलंड इलेव्हन या संघात नवोदित खेळाडू असले तरी आपली विस्कटलेली घडी बसवण्यावर विराट कोहलीच्या टीम इंडियचा भर असेल. 

तीन एक दिवसीय सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाजांना अपेक्षित लय सापडली नाही. हुकमी जसप्रीत बुमराची भेदकता हरवली आहे. महंमद शमीला विश्रांती दिली गेली त्यामागे दुखापतीची शंका व्यक्त करण्यात येत आहे. दुसऱ्या बाजूला सर्वात अनुभवी फिरकी गोलंदाज अश्‍विनला सराव सामन्यात भरपूर षटके टाकून खास ठसा उमटवता आला नाही. त्यामुळे आजपासून सुरु होणारा सराव सामना हाच शेवटचा आधार ठरणार आहे. 

दौऱ्यावर येणाऱ्या संघाला कोणतेच यजमान मंडळ चांगला सराव सामना देत नाही. म्हणजे कसोटी सामन्याला असेल अशी खेळपट्टी सराव सामन्याला नसते आणि कसोटी सामन्यात खेळणाऱ्या संभाव्य गोलंदाजांच्या क्षमतेचे गोलंदाज सराव सामन्यात नसतात. या दोन कारणामुळे सराव सामन्यात जास्त रंगत चढत नाही किंवा त्याला खरी धार येत नाही. याचा विचार करता भारतीय फलंदाजांना सराव मिळेल ज्यातून फार काही साध्य होणार नाही. 

गोलंदाजांची परीक्षा 

गोलंदाजांची जरा जास्त परीक्षा बघितली जाईल हॅमिल्टनच्या सेडन पार्कची खेळपट्टी फलंदाजांना साथ देईल. समोरच्या संघात गोलंदाज तगडे नसले तरी फलंदाज होतकरू आहेत. सिफर्ट, निशम सारखे फलंदाज निवड समितीवर प्रभाव टाकायला मोठी खेळी करून प्रयत्न करतील. 

पृथ्वी आणि शुभमनवर लक्ष 

सरावसामना अधिकृत प्रथम श्रेणीचा सामना म्हणून पकडला जाणार नाही म्हणजेचसामन्याच्या निकालाला मोठे महत्त्व नसेल. थोडक्‍यात भारतीयसंघातील सगळे प्रमुख फलंदाज फलंदाजी आणि सर्व गोलंदाज मारा करून आपल्या लयीचा अंदाज घेतील. सलामीच्या जोडीकरता चुरस कायम असल्याने पृथ्वी शॉ आणि शुभमन गिल यांच्याकडे जास्त लक्ष असेल. यातूनच विराट कोहली आणि संघ व्यवस्थापन सरावसामन्यातून पहिल्या कसोटीसाठी कोणाला अंतिम संघात जागा द्यायची याची योजना आखतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS 1st T20I: कुलदीप यादव पुन्हा बाकावर बसणार ! इरफान पठाणने निवडली प्लेइंग इलेव्हन; ४ गोलंदाज, २ ऑलराऊंडर संघात

Nashik News : प्लास्टिक, कागद, पुठ्ठा खाक! नवीन नाशिकमधील भंगार दुकानाला आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान

Latest Marathi News Live Update : लातूरमध्ये काँग्रेसला खिंडार, मनपाच्या माजी बांधकाम सभापतींचा भाजपात प्रवेश

Yeola Farmer Protest : केंद्र सरकारच्या क्रूर चेष्टेचा निषेध! खतांच्या भरमसाट दरवाढीविरोधात छावा क्रांतिवीर सेनेचे येवल्यात आंदोलन

Mumbai News: अनिलकुमार पवार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ईडीची याचिका स्वीकारली

SCROLL FOR NEXT