INDvsNZ : वेलिंग्टन : तिसऱ्या टी-20 सामन्याप्रमाणे रंगतदार ठरलेला चौथा टी-20 सामनाही टाय झाला. आणि सामन्याचा निर्णय सुपर ओव्हरवर ढकलला गेला.
यावेळेसही सुपर ओव्हरमध्ये टीम इंडियाने 1 बॉल राखत किवीजविरुद्ध विजय साजरा केला. रंगतदार झालेल्या सुपर ओव्हरमध्ये पहिल्यांदा न्यूझीलंडने भारतापुढे 14 रन्सचे टार्गेट ठेवले. ते टीम इंडियाने सहज पूर्ण केले.
डेथ बॉलर जसप्रीत बुमराहने सुपरओव्हरची ओव्हर टाकताना न्यूझीलंडच्या टीम सेफर्टला माघारी धाडत भारताला यश मिळवून दिले. तरीही त्यांनी भारतासमोर 14 रन्सचे टार्गेट ठेवले होते. त्यानंतर के. एल. राहुल पहिल्या दोन बॉलवर 10 रन्स काढून तो माघारी परतला. मात्र, कॅप्टन विराट कोहलीने संजू सॅमसनच्या साथीने 14 धावांचे टार्गेट पूर्ण करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. या विजयासह भारताने 5 सामन्यांच्या मालिकेत 4-0 अशी आघाडी घेतली आहे.
दरम्यान, नाणेफेक जिंकत न्यूझीलंडने पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. आणि आज कॅप्टनशीपची धुरा सांभाळणाऱ्या टीम साउदीचा विश्वास किवीज खेळाडूंनी सार्थ ठरविला. भारताचा तडाखेबाज सलामीवीर रोहित शर्माच्या जागी संघात स्थान मिळालेल्या संजू सॅमसनला लवकर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवत न्यूझीलंडला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर एका बाजूने विराट कोहली, श्रेयस अय्यर, शिवम दुबे हे ठराविक अंतराने बाद होत गेले. के. एल. राहुलनेही काही वेळ डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण तोही परतला.
पडझड सुरू असताना मैदानात उतरलेल्या मनिष पांडेने शार्दूल ठाकूर आणि नवदीप सैनी यांना जोडीला घेत भारताला दीडशेचा टप्पा ओलांडून दिला. यावेळी त्याने 3 चौकाराच्या मदतीने नाबाद अर्धशतकी खेळी साकारली. पण ती संघाच्या विजयात भर टाकू शकली नाही. न्यूझीलंडतर्फे इश सोधीने 4 ओव्हरमध्ये 26 रन देत 3 विकेट घेतल्या. तर हॅमिश बेन्नेटनं दोन विकेट्स घेतल्या.
टीम इंडियातील महत्त्वाचे खेळाडू नसल्यावर नवख्या खेळाडूंची काय धांदल उडते हे आजच्या सामन्यात पाहायला मिळाले. तर दुसरीकडे कर्णधार केन विल्यमसनच्या अनुपस्थितीत मैदानावर उतरलेल्या न्यूझीलंडच्या खेळाडूंनी आज कमाल केली. बॉलिंग, बॅटिंग आणि फिल्डींगमध्ये सुधारणा करत किवीजने मॅचवर सुरवातीपासूनच पकड ठेवली होती. पण एकवेळ हातात असलेला सामना किवीज खेळाडूंच्या चुकांमुळे भारताच्या पारड्यात पडला.
धावफलक :
भारत : 20 षटकांत 8 बाद 165.
के. एल. राहुल 39 (3 चौकार, 2 षटकार), मनीष पांडे 50 (3 चौकार); इश सोधी 26-4, बेनेट 41-2
न्यूझीलंड : 20 षटकांत 7 बाद 165
मुन्रो 64 (6 चौकार, 3 षटकार), सेइफर्ट 57 (4 चौकार, 3 षटकार), टेलर 24 (2 चौकार); शार्दूल ठाकूर 33-2, बुमरा 20-1
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.