Indian-Captain-Virat-Kohli 
क्रीडा

INDvsNZ : शेवटची मॅच न खेळताही कोहलीच्या नावावर दोन रेकॉर्ड!

सकाळ डिजिटल टीम

INDvsNZ : माऊंट मौगानुई : भारत-न्यूझीलंड यांच्यात झालेला पाचवा आणि अखेरचा टी-20 सामना भारताने जिंकत 5-0 ने मालिकाही जिंकली. यजमान किवीजना त्यांच्याच भूमीवर व्हाईटवॉश देण्याचा पराक्रम टीम इंडियाने पहिल्यांदाच केल्याने हा ऐतिहासिक विजय ठरला आहे.

भारताने विजयासाठी दिलेले 164 रन्सचे टार्गेट न्यूझीलंड गाठू शकलं नाही. अनुभवी रॉस टेलर आणि टीम सेफर्ट यांनी अर्धशतकी खेळी करत चांगली झुंज दिली. पण भारतीय गोलंदाजांनी शेवटी केलेल्या टिच्चून माऱ्यापुढे ते तग धरू शकले नाहीत. परिणामी, त्यांना पराभवास सामोरे जावे लागले. 

शेवटच्या सामन्यात कॅप्टन विराट कोहलीने विश्रांती घेतल्याने रोहित शर्माकडे नेतृत्व सोपविले गेले. पण तोही दुखापतग्रस्त झाल्याने के. एल. राहुलवर टीम इंडियाची धुरा सांभाळण्याची वेळ आली. त्याने ती जबाबदारी चोख पार पाडली. आणि टीम इंडियाने न्यूझीलंडला व्हाईट वॉश देत 5-0 असा मालिका विजय साजरा केला.

या विजयासह कॅप्टन विराट कोहलीच्या नावावर दोन वेगळे विक्रम नोंदविले गेले आहेत. टी-20 फॉरमॅटमध्ये दोन देशांमध्ये खेळली गेलेली मालिका सर्वाधिक दोन वेळा जिंकण्याचा विक्रम कोहलीच्या नावावर नोंदविला गेला आहे. यासह दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन फाफ डू-प्लेसिसचा विक्रम त्याने मोडला आहे.

1) विराट कोहली - 10 विजय

2) फाफ डू-प्लेसिस - 9 विजय

3) इयान मॉर्गन - 7 विजय

4) डॅरेन सामी - 6 विजय 

तसेच न्यूझीलंडमध्ये जाऊन टी-20 मालिका जिंकणारा तो पहिला कॅप्टन ठरला आहे. याआधी दोन्ही संघांदरम्यान 11 सामने खेळले गेले होते. त्यापैकी 8 सामन्यात न्यूझीलंडने बाजी मारली होती. पण टीम इंडियाने ही मालिका जिंकत आठ सामने जिंकण्यात न्यूझीलंडशी बरोबरी साधली आहे.  

5 फेब्रुवारीपासून भारत-न्यूझीलंड वन-डे सीरिजला सुरवात होणार आहे. त्यामध्ये टीम इंडिया कशी कामगिरी करते याकडे आता सर्वांचे लक्ष्य लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: ‘आमदारगिरी’चा बनाव तरुणाच्या अंगाशी! पुण्यात ऑडीवर लावलं 'आमदार' स्टिकर, मद्यधुंद अवस्थेत कार पळवणाऱ्या २३ वर्षीय तरुणाला घेतलं ताब्यात

Nandigram Express : नंदिग्राम एक्स्प्रेस चुकीच्या रुळावर लोको पायलटच्या सतर्कतेने अनर्थ टळला, किनवट स्थानकावर दोन तास खोळंबा

Latest Marathi News Update : मराठा समाजाला न्याय द्या, पण ओबीसींचे वाटोळे सरकारने केले विजय वडेट्टीवार यांचा घणाघात

Japan's Population: ११४ वर्षांच्या आजी अन् ११२ वर्षांचे आजोबा! काय आहे जपानमधील नागरिकांच्या दीर्घायुष्याचे रहस्य?

MPSC Success Story: एक एकर शेती, आई-वडिलांची मजुरी अन् पूजाची जिद्द; चौथ्या प्रयत्नात MPSC परीक्षेत महसूल सहाय्यकपदी यश, जिद्दीची यशोगाथा

SCROLL FOR NEXT