क्रीडा

IND vs AUS: 'क्रिकेटच्या देवा'ने केलं स्मृती मंधानाचं कौतुक!

विराज भागवत

स्मृतीने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर ठोकलं धडाकेबाज शतक

INDW vs AUSW Pink Ball Test: भारतीय महिला संघ आपला पहिलावहिला दिवस रात्र पद्धतीचा कसोटी सामना खेळत आहे. गुलाबी चेंडूच्या या सामन्यात भारताने पहिल्या दोन दिवसांवर आपले वर्चस्व राखले. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरूद्ध दुसऱ्या दिवशी पावसामुळे खेळ थांबण्याआधी ५ बाद २७६ धावांपर्यंत मजल मारली. यात मोलाचा वाटा उचलला सलामीवीर स्मृती मंधानाने. तिने दमदार शतक ठोकत आपली पात्रता सिद्ध केली. क्रिकेटचा देव मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याने स्मृतीचे तोंडभरून कौतुक केले.

स्मृती मंधानाच्या बॅटने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर हल्लाबोल केला. ऑस्ट्रेलियन कर्णधार मेग लॅनिंग हिने नाणेफेक जिंकत प्रथम भारतीय संघाला फलंदाजीसाठी निमंत्रण दिले. स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा या दोघींनी २५ षटके खेळत ९३ धावांची सलामी दिली. शफाली ६४ चेंडूत ३१ धावा काढून बाद झाला. स्मृती मंधानाने मात्र दमदार फलंदाजी करत सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शतक झळकावले. गुलाबी चेंडूने दिवस रात्र कसोटी सामन्यात शतक झळकावणारी स्मृती ही पहिली भारतीय महिला ठरली. तिच्या खेळीचे खुद्द सचिनने कौतुक केले.

दरम्यान, स्मृतीने आपल्या खेळीत २२ चौकार आणि एका षटकारासह १२७ धावा केल्या. स्मृती बाद झाल्यावर पूनम राऊत (३६), मिताली राज (३०) आणि यास्तिका भाटिया (१९) या तीन फलंदाजांना फारशी छाप पाडता आली नाही. त्यामुळे भारताने २७६ धावांपर्यंत पोहोचताना ५ गडी गमावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी राजकीय घडामोड! ठाकरे गटातील ६ बंडखोर खासदारांचे शिंदे सेनेत विलिनीकरण अधिकृत, लोकसभा सचिवालयाचा निर्णय

ENG vs IND: एकिकडे निवृत्तीची चर्चा, तर दुसरीकडे गंभीर-रोहितच्या लॉर्ड्सच्या बाल्कनीत गप्पा; Video तुफान व्हायरल

Latest Marathi News Live Update : भविष्यात पुणे आधुनिक शहर म्हणून ओळखलं जाईल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Kannad Crime : जेहूर येथे विवाहितेने विष प्राशन करून संपविले जीवन; पतीसह सासू-सासऱ्यांवर गुन्हा नोंद

Almatti Dam Water Level Latest Update : आलमट्टी धरणाचे पाणी केवळ पिण्यासाठीच; कृष्णा भाग्य जल निगमचा आदेश, शेतीवर परिणाम होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT