क्रीडा

IPL 2021 : कोणत्या संघातून कोण खेळणार? संपूर्ण यादी

सुशांत जाधव

IPL 2021 In UAE New Squads after Replacement : कोरोनाच्या संकटामुळे निम्म्यावर अडखळलेल्या आयपीएल स्पर्धेचा बिगुल आता युएईत वाजणार आहे. 19 सप्टेंबरपासून दुसऱ्या टप्प्यातील स्पर्धेला सुरुवात होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात काही खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर फ्रेंचायझी नव्या टीम बांधणीसह जेतेपदाच्या शर्यतीत उतरण्यास उत्सुक असतील. अनेक संघात नव्या खेळाडूंची एन्ट्री झाली असून नव्या रणनितीसह कोणता संघ दमदार कामगिरी करुन दाखवणार हे पाहणे उत्सुक ठरेल. 14 व्या हंगामातील स्पर्धेत 31 सामने रंगणार आहेत. अंतिम सामना 15 ऑक्टोबरला खेळवण्यात येईल.

दुसऱ्या टप्प्यातील स्पर्धेपूर्वी राजस्थान रॉयल्सला सर्वात मोठा धक्का बसला आहे. जोफ्रा आर्चर, जोस बटलर आणि बेन स्टोक्स यांनी स्पर्धेतून माघार घेतलीये. त्यांच्या जागी राजस्थानने नव्या गड्यांना आपल्या ताफ्यात घेतले आहे. वेस्ट इंडिजचा एविन लुईस आणि ओशेन शॉमस याच्यासह न्यूझीलंडचा ग्लेन फिलिप्स राजस्थानकडून खळताना दिसणार आहेत. दुसऱ्या टप्प्यानंतर संघात काय बदल झालेत यावर एक नजर...

दिल्ली कॅपिटल्स : शिखर धवन, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, मार्कस स्टॉयनिस, क्रिस वोक्स, आर अश्विन, अक्षर पटेल, अमित मिश्रा, ललित यादव, प्रविण दुबे, कागिसो रबाडा, उमेश यादव, रिपल पटेल, विष्णू विनोद, लुकमन मेरीवाला, एम सिद्धार्थ, टॉम कुरेन, सॅम बिलिंग.

2. चेन्नई सुपर किंग्ज : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), सुरेश रैना, अंबाती रायडू, केएम असिफ, दीपक चाहर, ड्वेन ब्रावो, फाफ ड्युप्लेसिस, इम्रान ताहिर, एन जगदीशन, करन शर्मा, लुंगी एनिग्डी, मिचेल सँटनर, रविंद्र जडेजा, ऋतूराज गायकवाड. शार्दुल ठाकूर, सॅम कुरेन, आर साइ किशोर, मोईन अली, कृष्णप्पा गौथम, चेतेश्वर पुजारा, हरिशंकर रेड्डी, भगत वर्मा, सी हरी निशांथ, जोश हेजलवूड.

3. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु : विराट कोहली (कर्णधार), एबी डिव्हिलियर्स, देवदत्त पदिक्कल, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, जॉर्ज गॅरटॉन, अकाश दीप, पवन देशपांडे, टिम डेविड, शहाबाज अहमद, नवदीप सैनी, वायनाडू हंसरंगा, कायले जमिसन, ग्लेन मॅक्सवेल, रजद पाटीदार, सचिन बेबी, मोहम्मद अझरुद्दिन, डॅनियल क्रिस्टन, केएस भारत, सुयस प्रभूदेसाई, दुश्मथा चमीरा, हर्षल पटेल.

4. मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (कर्णधार), एडम मिल्ने, आदित्य तारे, अलमोलप्रीत सिंग, अनुकूल रॉय, अर्जुन तेंडुलकर, क्रिस लेन, धवल कुलकर्णी, हार्दिक पांड्या, इशान किशन, जेम्स निशम, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, केरॉन पोलार्ड, कृणाल पांड्या, मार्को जानसन, मोहसिन खान, नॅथन कुल्टर नील, पियुष चावला, क्विंटन डिकॉक, राहुल चाहर, सौरभ तिवारी, सुर्यकुमार यादव, ट्रेंट बोल्ड, युद्धवीर सिंग.

5. राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, यशस्वी जयस्वाल, मनन ओहरी, अनुज रावत. रियान पराग, डेविड मिलर, राहुल तेवतिया, महिपाल लोमरॉर, श्रेयस गोपाल, मयांक मर्केंड्ये, ग्रेन फिलप्स, तरबेज शम्सी, जयदेव उनादकट, कार्तिक त्यागी, शिवम दुबे, क्रिस मॉरिस, मुस्तफिझुर रहिम, चेतन सकारिया, केसी किरयप्पा, लॅम लिविंगस्टोन, कुलदीप यादव, आकाश सिंग.

6. पंजाब किंग्ज : केएल राहुल (कर्णधार), मयांक अग्रवाल, ख्रिस गेल, मनदीप सिंग, प्रबसिमरन सिंग, निकोलस पूरन, सरफराज खान, दीपक हुड्डा, एम अश्विन, रवि बिश्नोई, हरप्रीत ब्रार, मोहम्मद शमी, अर्शदिप सिंग, इशान पोरेल, दर्शन निलकांडे, क्रिस जार्डन, डेविड मलान, अदील रशीद, शाहरुख खान, नॅथन इलीस, मोसीस हॅन्रीक्स, जलाज सक्सेना, उत्कर्ष सिंग, फेबिन एलन, सौरभ कुमार.

7. कोलकाता नाइट रायडर्स: इयॉन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक, शुभमन गिल, नितीश राणा, टिम सेफर्ट, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, कुलदीप यादव, शिवम मावी, लॉकी फर्ग्युसन, टीम साउथी, कमलेश नागरकोटी, संदीप वॉरियर, प्रसिद्ध कृष्णा, राहुल त्रिपाठी, वरुण चक्रवर्थी, शाकिब अल हसन, शेल्डन जॅकसन, वैभव अरोरा, हरभजन सिंग, करुन नायर, बेन कटिंग, व्यंकटेश अय्यर, पवन नेगी.

8. सनरायझर्स हैदराबाद : केन विल्यमसन (कर्णधार), डेविड वॉर्नर विराट सिंग, मनिश पांड्ये, प्रियम गर्ग, वृद्धिमान साहा, जॉनी बेयरस्टो, जेसन रॉय, श्रीवत्स गोस्वामी, विजय शंकर, मोहम्मद नबी, केदार जाधव, जे सुचित, जेसन होल्डर, अभिषेक शर्मा, अब्दुल समद, भुवनेश्वर कुमार, राशीद खान, टी नटराजन, संदीप शर्मा, खलील अहमद, सिद्धार्थ कौल, बासील थंपी, शहाबाज नदीम, मुजीब उर रहमान.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT