IPL 2022 Krunal Pandya Wife Pankhuri Sharma
IPL 2022 Krunal Pandya Wife Pankhuri Sharma Sakal
क्रीडा

लखनौनं सामना जिंकल्यावर क्रुणालची बायको या कारणामुळं चर्चेत

सकाळ डिजिटल टीम

IPL 2022 Krunal Pandya Wife Pankhuri Sharma : आयपीएलच्या पंधराव्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ जाएंट्स संघात शेवटच्या षटकापर्यंत सामना रंगल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात दबावाच्या परिस्थितीत मैदानात उतरलेल्या युवा आयुष बदोनी याने दिमाखदार फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून दिला. दुसऱ्या बाजूला क्रुणाल पांड्याही (Krunal Pandya) नाबाद राहिला. अखेरच्या 12 चेंडूत 19 धावांची गरज असताना क्रुणाल पांड्यानं 19 व्या षटकात एक चौकार आणि एक षटकार खेचत संघाला विजयाच्या समीप आणले. सामना जिंकल्यानंतर स्टँडमध्ये पत्नी पंखुरी शर्मा (Pankhuri Sharma)हिने त्याच्या खेळीवर आनंद साजरा केल्याचे पाहायला मिळाले. तिचा स्टँडमधला फोटो व्हायरलही होताना दिसतोय.

आयपीएलच्या सामन्यादरम्यान खेळाडूंशिवाय त्यांच्या कुटुंबियातील सदस्य चर्चेचा विषय ठरत असतात. दिल्ली विरुद्ध लखनौ लढतीत क्रुणाल पांड्याच्या पत्नीनं लक्ष वेधलं. ती ज्या स्टँडमध्ये उभी होती त्या ठिकाणी जवळपास सर्वजण लखनौ संघाची जर्सी घालून संघाला प्रोत्साहन देताना दिसले. पण क्रुणालची पत्नी पंखुरी शर्मा एकटी वेगळ्या गेटअपमध्ये दिसली. तिने पांढऱ्या रंगाचा टी शर्ट परिधान केला होता. तिच्या या वेगळेपणाची सोशल मीडियावर चर्चा रंगताना दिसत आहे.

नाणेफेक गमावल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करताना दिल्ली कॅपिटल्स संघाने 3 विकेट्सच्या मोबदल्यात 149 धावा केल्या होत्या. लोकेश राहुलच्या नेतृत्वाखालील संघाने 4 विकेट्स गमावत अखेरच्या षटकात सामना खिशात घातला. लखनौकडून क्विंटन डिकॉकने 52 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 80 धावंची खेळी केली. मोक्याच्या क्षणी पांड्याने 14 चेंडूत नाबाद 19 धावा करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तो संघाला विजय मिळवून देत नाबाद परतल्यानंतर पत्नी पंखुरिया चांगलीच खूश झाल्याचे पाहायला मिळाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: तेव्हा अजित पवार नवखे होते, २००४ साली मुख्यमंत्री पदाची संधी का घालवली? शरद पवारांनी सांगितला माइंड गेम

Weight Gain Foods : ‘या’ खाद्यपदार्थांचे सेवन केल्याने झपाट्याने वाढू शकते वजन, खाण्यापूर्वी जरूर करा विचार

गोफण | 'बिनशर्त'ची सुपारी दणक्यात वाजली!

MS Dhoni : MS धोनीमुळे हरली CSK? 'या' मोठ्या चुकीमुळे प्लेऑफचे तिकीट गेलं हातातून

Nancy Tyagi: 30 दिवस, 1000 मीटर कापड अन् 20 किलो वजन; कान चित्रपट महोत्सवात परिधान केला स्वत: शिवलेला ड्रेस, नॅन्सी त्यागी आहे तरी कोण?

SCROLL FOR NEXT