क्रीडा

PBKS vs KKR : अर्शदीपने केकेआरला करायला लावला भांगडा; पंजाबला पाऊसही रोखू शकला नाही

अनिरुद्ध संकपाळ

IPL 2023 KKR vs PBKS : पंजाब किंग्जने आयपीएल 2023 ची विजयी सुरूवात केली. त्यांनी कोलकाता नाईट रायडर्सचा 7 धावांनी विजय मिळवला. सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यामुळे निकाल हा डकवर्थ लुईस नियमाने देण्यात आला. पंजाबकडून वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने भेदक मारा करत 3 षटकात 19 धावा देत 3 बळी टिपले.

पंजाबने प्रथम फलंदाजी करताना राजपक्षेच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर 191 धावा केल्या होत्या. त्याला कर्णधार शिखर धवनने 40 धावांची खेळी करत चांगली साथ दिली. विजयासाठी 192 धावांचे आव्हान घेऊन मैदनात उतरलेल्या केकेआरने आक्रमक सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. मात्र पंजाबने सुरूवातीपासूनच केकेआरला धक्के दिले.

त्यांची अवस्था 16 षटकात 7 बाद 146 धावा अशी केली. केकेआरला विजयासाठी 24 चेंडूत 46 धावांची गरज असताना पाऊस आला अन् सामन्या थांबला. मात्र डकवर्थ लुईन नियमानुसार सामना पंजाबने जिंकला.

आयपीएल 2023 च्या दुसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकून प्रथम पंजाब किंग्जला फलंदाजीसाठी पाचारण केले. मोहालीच्या पाटा खेळपट्टीवर पंजाबने देखील दमदार सुरूवात करत 5 षटकात 50 धावा चोपल्या. सलामीवीर प्रभसिमरन सिंगने 12 चेंडूत 23 धावा ठोकल्या. मात्र टीम साऊदीने त्याला दुसऱ्याच षटकात बाद करत केकेआरला मोठा दिलासा दिला.

प्रभसिमरन बाद झाल्यानंतर शिधर धवन आणि भानुका राजपक्षाने आक्रमक खेळ करण्यास सुरूवात केली. राजपक्षाने धडाकेबाज अर्धशतक ठोकत पंजाबला 11 व्या षटकात शतकी मजल मारून दिली. मात्र 32 चेंडूत 50 धावा करून राजपक्षा बाद झाला. दुसऱ्या बाजूला शिखर सावध फलंदाजी करत होता.

राजपक्षा बाद झाल्यानंतर आलेल्या जितेश शर्माने 11 चेंडूत 21 धावा चोपल्या खऱ्या मात्र त्याला साऊदीने शांत केले. यानंतर वरूण चक्रवर्तीने शिखर धवनचा 40 धावांवर त्रिफळा उडवला. पंजाबची अवस्था 4 बाद 143 धावा अशी झाली असताना सिकंदर रझा आणि सॅम करन यांनी संघाला दीडशतकी मजल मारून दिली.

मात्र शेवटच्या 5 षटकात केकेआरने सामन्यावर नियंत्रण मिळवण्यास सुरूवात केली. सुनिल नारायणने रझाला 16 धावांवर बाद केले. त्यानंतर करनने 17 चेंडूत 26 तर शाहरूख खानने 7 चेंडूत 11 धावा करत संघाला 20 षटकात 5 बाद 191 धावांपर्यंत मजल मारून दिली. केकेआरने पंजाबला 200 धावांच्या आत रोखले.

(Sports Latest News)

हेही वाचा : महिलांनो तरुणपणी घेतलेली जमीन उतारवयात होईल आधार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi on Pune Porsche Accident: पुणे पोर्शे दुर्घटनेवरून राहुल गांधींनी PM मोदींवर सोडलं टीकास्त्र, म्हणाले 'दोन भारत...'

Badminton Rankings: भारताच्या सात्विक-चिरागचा बॅडमिंटनमध्ये डंका कायम! पुन्हा मिळवला नंबर वनचा ताज

अबबऽऽऽ चक्क मिळाले 100 टक्के गुण! बुद्धिबळ खेळणाऱ्या तनिषाने 100 टक्के गुण मिळवत जिंकला 'बारावी'चा डाव

Nashik Accident News: इगतपुरीच्या भावली धरणात ५ जणांचा बुडून मृत्यू; मृतांमध्ये तीन मुली व दोन मुलांचा समावेश

RR vs RCB Eliminator : कोणता रॉयल होणार 'इलिमिनेट', धडाकेबाज RCB समोर राजस्थान कामगिरी सुधारणार का?

SCROLL FOR NEXT