Abhishek Sharma esakal
IPL

Abhishek Sharma : अभिषेक शर्माने अवघ्या 22 मिनिटात मोडला हेडचा SRH कडून सर्वात वेगवान अर्धशतकाचा विक्रम

Abhishek Sharma MI vs SRH : मुंबईची धुलाई करण्यात हेड अन् अभिषेक शर्मामध्ये लागली चुरस, दरम्यान झाले अनेक विक्रम

अनिरुद्ध संकपाळ

Abhishek Sharma hit Fastest Half Century For Sunrisers Hyderabad : आयपीएल 2024 च्या 8 व्या सामन्यात धावांची, षटकारांची, चौकारांची आणि विक्रमांचा तुफान पाऊस पडला आहे. ट्रॅविस हेडने हैदराबादकडून सर्वात वेगवान अर्धशतक (18 चेंडूत अर्धशतक) ठोकण्याला अवघे 22 मिनिटेच झाली होती. तोच अभिषेक शर्माने 16 चेंडूत अर्धशतक ठोकत हा विक्रम मोडला. हेडने 8.02 मिनिटांनी हा विक्रम केला होता. तर अभिषेकने 8.24 मिनिटांनी हा विक्रम मोडला.

आयपीएल इतिहासातील पहिल्या 10 षटकात सर्वाधिक धावा

  • 2024 - सनराईजर्स हैदराबादने मुंबईविरूद्ध पहिल्या 10 षटकात 2 बाद 148 धावा ठोकल्या.

  • 2021 - मुंबई इंडियन्सने हैदराबादविरूद्ध 10 षटकात 3 बाद 131 धावा ठोकल्या.

  • 2014 - पंजाब किंग्जने हैदराबादविरूद्ध 10 षटकात 3 बाद 131 धावा केल्या होत्या.

  • 2008 - डेक्कन चार्जर्सने मुंबईविरूद्ध 10 षटकात बिनबाद 130 धावा केल्या होत्या.

  • 2016 - आरसीबीने पंजाब किंग्जविरूद्ध पहिल्या 10 षटकात बिनबाद 129 धावा केल्या होत्या.

आयपीएल इतिहासातील संघाने केलेले सर्वात वेगवान शतक

  • चेन्नईने पंजाब किंग्जविरूद्ध 2014 मध्ये 6 षटकात शतक ठोकलं होतं.

  • केकेआरने 2017 मध्ये आरसीबीविरूद्ध 6 षटकात 100 धावा ठोकल्या.

  • त्यानंतर चेन्नईने मुंबईविरूद्ध 2015 मध्ये 6.5 षटकात शतक पूर्ण केलं होतं.

  • हैदराबादने 2024 मध्ये मुंबईविरूद्ध 7 षटकात शतकी मजल मारली.

सनराईजर्स हैदराबादने आज मुंबई इंडियन्सच्या प्रत्येक गोलंदाजाची धुलाई केली. याला फक्त जसप्रीत बुमराह अपवाद ठरला. हैदराबादने 15 व्या षटकापूर्वीच 200 धावांचा टप्पा पार केल्याने ते आयपीएलमधील सर्वाधिक धावसंख्या (263 धावा) करण्याचा विक्रम मोडण्याच्या जवळपोहचले. 2013 मध्ये आरसीबीने पुणे वॉरियर्सविरूद्ध 5 बाद 263 धावा केल्या होत्या.

(IPL Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT