Akash Madhwal LSG vs MI  esakal
IPL

Akash Madhwal LSG vs MI : लखनौची पळता भुई थोडी! नवीनला आकाशचं प्रत्युत्तर; क्रुणाल झाला,मुंबईचा मोर्चा हार्दिककडे

अनिरुद्ध संकपाळ

Akash Madhwal LSG vs MI : मुंबई इंडियन्सने ठेवलेल्या 183 धावांचा पाठलाग करताना लखनौ सुपर जायंट्सला 101 धावांपर्यंतच मजल मारता आली. मुंबईच्या आकाश माधवालने नवीन उल हकचा दमदार स्पेल वाय घालवला. माधवालने 3.3 षटकात फक्त 5 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. तर लखनौचे तीन फलंदाज धावबाद झाले. लखनौची मुंबईच्या गोलंदाजांसमोर पळता भुई थोडी झाली. लखनौकडून मार्कस स्टॉयनिसने झुंजार 40 धावांची खेळी केली. त्यानंतर कायल मेयर्स (18) आणि दीपक हुड्डा (1) यांनाच दुहेरी आकडा गाठता आला.

मुंबई इंडियन्सने क्रुणालच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या लखनौचा 81 धावांनी पराभव केला. आता ते अहमदाबादमध्ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळणाऱ्या गुजरात टायटन्सला आव्हान देणार आहेत. विशेष म्हणजे हे दोघेही मुंबई इंडियन्सचे 'माजी' खेळाडू आहे.

मुंबईने 183 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या लखनौ सुपर जायंट्सची पॉवर प्लेमध्ये 2 बाद 23 धावा अशी अवस्था करत दमदार सुरूवात केली. मात्र त्यानंतर लखनौचा कर्णधार क्रुणाल पांड्या आणि मार्कस स्टॉयनिस यांनी आक्रमकपणे लखनौचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी संघाला 8 षटकात 69 धावांपर्यंत पोहचवले. मात्र ही जोडी पियुष चावलाने फोडली. त्याने क्रुणालला 8 धावांवर बाद केले.

यानंतर आकाश माधवालने आपल्या भेदक माऱ्याने लखनौला हैराण करून टाले. त्याने आयुष बदोनी (1) आणि निकोलस पूरन (0) यांना स्वस्तात घरचा रस्ता दाखवला. यानंतर 27 चेंडूत 40 धावा करणारा स्टॉयनिस, कृष्णाप्पा गौतम दोघेही धावबाद झाले. यानंतर दीपक हुड्डाने 15 धावांची खेळी केली. मात्र त्याचीही धाव काढताना विकेट गेली. यानंतर माधवालने उरला सुरला लखनौचा संघ 101 धावात गारद केला.

त्याने 3.3 षटकात अवघ्या 5 धावा देत 5 बळी टिपले. तर लखनौचे 3 फलंदाज धावबाद झाले. उरलेल्या दोन विकेट ख्रिस जॉर्डन आणि पियुष चावला यांनी वाटून घेतल्या.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्ससमोर विजयासाठी 183 धावांचे आव्हान ठेवले आहे. पहिल्यापासून आक्रमक खेळणाऱ्या मुंबईला नवीन उल हकने मुंबईचे रोहित शर्मा, कॅमरून ग्रीन, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्माची शिकार केली. मात्र मुंबईचा इम्पॅक्ट प्लेअर नेहाल वधेराने 12 चेंडूत 23 धावा चोपत मुंबईला 182 धावांपर्यंत मजल मारून दिली. मुंबईकडून ग्रीनने सर्वाधिक 41 तर सूर्याने 33 धावांचे योगदान दिले. तिलकनेही 26 धावा करून हातभार लावला.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Crisis: होर्मुजमध्ये २ जहाजांवर हल्ला, युद्धाची चाहूल! भारतीय टँकर्सनी घेतला यू-टर्न; ८.३ मिलियन बॅरल तेल अडकले

फलंदाजांना धडकी भरवणाऱ्या गोलंदाजाचा मृत्यूशी संघर्ष! ICU मधील त्याची अवस्था पाहून क्रिकेट विश्वात हळहळ...

Rahul Gandhi FIR प्रकरणात मोठा ट्विस्ट! हायकोर्टाने स्वतःचाच आदेश थांबवला, नेमकं काय घडलं?

RCB vs DC Live: टीम डेव्हिडचा पराक्रम, SIX पाहून भारी होती विराटची रिअ‍ॅक्शन; पण, कृणाल पांड्या का संतापला? Video Viral

Washing Machine Safety : वॉशिंग मशीन वापरताना अजिबात करू नका 'या' 2 चुका, नाहीतर घरात शॉर्टसर्किट होऊन लागू शकते आग

SCROLL FOR NEXT