Amit Shah in IPL 2022 Final sakal
IPL

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची मैदानावर सहकुटुंब हजेरी

अंतिम सामना पाहण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कुटुंबासह मैदानात

Kiran Mahanavar

Amit Shah in IPL 2022 Final: आयपीएल ही जगातील सर्वाधिक लोकप्रिय क्रिकेट लीग आहे. आयपीएलच्या 15 व्या हंगामात आज गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात अंतिम सामना होत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणारा हा अंतिम सामना पाहण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कुटुंबासह आले आहे.

गृहमंत्री अमित शहा यांना मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आले तेव्हा मैदानात उपस्थित असलेल्या चाहत्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता. अमित शहा यांनीही चाहत्यांना विजयाची निशाणी दाखवली, त्यानंतर स्टेडियममध्ये मोदी-मोदीच्या घोषणाही होऊ लागल्या. गृहमंत्री अमित शाह सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. अमित शाह यांचा मुलगा जय शाह बीसीसीआयचा सचिव आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमचे उद्घाटनही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झाले आहे. हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे, ज्यामध्ये एका वेळी सुमारे 1 लाख 30 हजार प्रेक्षक बसू शकतात.

गुजरात टायटन्सचा हा पहिलाच आयपीएल फायनल आहे, विशेष म्हणजे गुजरात पहिल्यांदाच आपल्या घरच्या मैदानावर सामना खेळत आहे. गुजरात टायटन्सने आयपीएलच्या संपूर्ण हंगामात चांगली कामगिरी केली, साखळी सामन्याच्या समाप्तीनंतर, संघ गुणतालिकेत नंबर-1 वर होता. तसेच, गुजरात टायटन्स हा अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारा पहिला संघ ठरला.

नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या अंतिम सामन्यात राजस्थान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याचा हा निर्णय योग्य ठरला नाही. संघाला 20 षटकांत नऊ गडी गमावून केवळ 130 धावा करता आल्या. राजस्थानकडून जोस बटलरने सर्वाधिक ३९ धावा केल्या. तर गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने तीन बळी घेतले. राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्ससमोर विजयासाठी 131 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

ढिंग टांग : वाजत गाजत या...!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT