WTC Ajinkya Rahane MS Dhoni  esakal
IPL

WTC Ajinkya Rahane MS Dhoni : धोनीने एक फोन फिरवला अन् रहाणेसाठी टीम इंडियाची दारे पुन्हा उघली?

अनिरुद्ध संकपाळ

WTC Ajinkya Rahane MS Dhoni : चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने अनेक माजी खेळाडूंच्या कारकिर्दिला पुनरुज्जीवन दिले आहे. धोनी कर्णधार असतानाही त्याला ज्या खेळाडूवर विश्वास आहे त्याला भरपूर संधी द्यायचा त्याचा आत्मविश्वास वाढवायचा. आता कर्णधार नसला तरी त्याचा सल्ला अजूनही अनेक लोकं घेतात. याचाच फायदा भारताचा माजी कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणेला झाल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार राहुल द्रविड आणि महेंद्रसिंह धोनी यांच्यातील एका फोन कॉलमुळे रहाणेसाठी पुन्हा एकदा टीम इंडियाची दारे उघडली गेली.

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले की, 'जेव्हापासून श्रेयस अय्यरला दुखापत झाली तेव्हापासून अजिंक्य रहाणे संघ व्यवस्थापनाच्या योजनेचा एक भाग बनला. त्याला इंग्लंडमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. तो तेथे यशस्वी देखील ठरला आहे. मात्र रहाणे जवळपास एक वर्षापासून संघात नाहीये. आम्ही त्याला फक्त रणजी ट्रॉफीमध्येच पाहिले आहे. त्यामुळेच राहुल द्रविडने एमएस धोनीकडे अजिंक्यसाठी विचारणा केली."

अजिंक्य रहाणे कसा आला संघात?

श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाल्यावर राहुल द्रविड आणि राहित शर्मा हे अजिंक्य रहाणेला संघात घेण्यासाठी उत्सुक होते. दुसरीकडे सर्फराज खानने शतकांचा रतीब घालत निवडसमितीवर दबाव टाकला होता. मात्र आयपीएलमध्ये त्याची कामगिरी फारशी चांगली झाली नाही.

मार्क वूडसमोर सर्फराजला फलंदाजी करणे जमत नव्हते. यामुळेच अजिंक्य रहाणेने बाजी मारली. दुसरीकडे सूर्यकुमार यादवला देखील फारशी चमक दाखवता आली नाही. अजिंक्यने आयपीएलमध्ये उत्तम स्ट्राईक रेटने धावा करत आपला फॉर्म सिद्ध केला. धोनीने त्याला त्याच्या स्टाईलने खेळण्याची मुभा दिली होती.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात १४ विधेयकं मांडली, १२ मंजूर; चर्चेच्या वेळेत अन् प्रश्नोत्तरात कामकाज नापास

'हा' प्रसिद्ध राजकीय नेता अभिनेत्रीला करायचा अश्लिल मॅसेज, म्हणायचा..'हॉटेलवर चल' अभिनेत्रीने केला धक्कादायक अनुभव शेअर

बेस्ट पतपेढीत एकही जागा नाही, राज ठाकरे म्हणाले,'मला माहितीच नाही विषय, छोटी गोष्ट आहे रे'

'सावरखेड एक गाव' फेम अभिनेत्रीची छोट्या पडद्यावर दणक्यात एंट्री; 'स्टार प्रवाहच्या 'या' मालिकेत साकारणार भूमिका

माझ्या मुलाने आणखी काय करायला हवं? श्रेयस अय्यरला Asia Cup 2025 संघात संधी नाही मिळाली; वडिलांना राग अनावर

SCROLL FOR NEXT