MS Dhoni IPL 2023  
IPL

MS Dhoni IPL 2023: कोचच्या खुलाशाने CSK मध्ये खळबळ! धोनी पुढील सामन्यातुन बाहेर?

Kiran Mahanavar

MS Dhoni IPL 2023: इंडियन प्रीमियर लीग 2023च्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जला आतापर्यंत 4 सामन्यांमध्ये दुसरा पराभव स्वीकारावा लागला आहे. राजस्थान रॉयल्सने चेन्नई संघाचा 3 धावांनी पराभव करून गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले आहे. या सामन्याच्या निकालातून संघ सावरू होता पण चेन्नईचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी आणखी एक धक्का दिला आहे.

चेन्नई संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि वेगवान गोलंदाज सिसांडा मगाला दुखापत झाली आहे. याचा खुलासा खुद्द चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी केला आहे. तो म्हणाला की संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त आहे.

गुजरात टायटन्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात धोनीला गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर पुढच्या काही सामन्यांमध्ये तो लंगडताना दिसला. मात्र, त्याने चेन्नईच्या चारही सामन्यांमध्ये तो खेळला आहे. पुढील सामन्यात तो खेळणार का हा प्रश्न पडला आहे.

धोनीबद्दल फ्लेमिंग काय म्हणाले?

फ्लेमिंग म्हणाला की, धोनीला गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त आहे, जे तुम्ही त्याच्या काही हालचालींमध्ये पाहू शकता. या दुखापतीमुळे त्याला काही प्रमाणात अडचणी येत आहेत. तो स्पर्धा सुरू होण्याच्या अनेक महिने आधीच तयारी सुरू करतो. त्याने रांचीमध्ये नेट्समध्ये सराव केला आहेत. फ्लेमिंगने विश्वास व्यक्त केला की भारताचा माजी कर्णधार त्याच्या दुखापतीचा सामना करेल आणि संघाचे नेतृत्व करत राहील.

सीएसकेच्या जखमी खेळाडूंची संख्या वाढली

सीएसकेच्या जखमी खेळाडूंची यादी दिवसेंदिवस वाढत आहे. आयपीएल लिलावात 16.25 कोटी रुपयांना विकत घेतलेला इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स टाचेच्या दुखापतीमुळे काही सामन्यांमधून बाहेर पडला आहे, तर वेगवान गोलंदाज दीपक चहरला मुंबई इंडियन्सविरुद्ध हॅमस्ट्रिंग दुखापत झाली आहे. दीपक संपूर्ण हंगामासाठी संघातून बाहेर असल्याचे मानले जात आहे. आता वेगवान गोलंदाज सिसांडा मगालाला दुखापत झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SEBI Report: शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनो सावधान! 91% लोकांना होतोय तोटा; सेबीच्या अहवालात काय आहे?

Tiger Crisis: धक्कादायक... राज्यात सरासरी पाच दिवसांत एका वाघाचा मृत्यू; विदर्भात सहा महिन्यांत तीस वाघ गमावले, महाराष्ट्र आघाडीवर

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल मिळाला पाहिजे; पाकिस्ताननंतर आता इस्त्रायलकडून शिफारस

Bharat Bandh: 'या' दिवशी भारत बंदची घोषणा, 25 कोटींहून अधिक कर्मचारी जाणार देशव्यापी संपावर, अत्यावश्यक सेवा देखील होणार ठप्प

Video : दगडाच्या काळजाची आई! चार वर्षांच्या चिमुकलीला उलथनं तुटेपर्यंत मारहाण, नरड्यावर पाय देऊन उभी राहिली; धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT