David Warner Brought By Delhi Capitals  team in IPL 2022 Auction
David Warner Brought By Delhi Capitals team in IPL 2022 Auction  ESAKAL
IPL

IPL 2022 Auction: वॉर्नरला हैदराबादने नाकरले दिलवाल्या दिल्लीने स्विकारले

अनिरुद्ध संकपाळ

बंगळुरू: ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नर (David Warner) दिल्ली कॅपिटल्सच्याच्या गळाला लागला आहे. दिल्लीने डेव्हिड वॉर्नरसाठी 6.25 कोटी रूपये मोजले. आयपीएलच्या 15 व्या हंगामासाठी बंगळुरूमध्ये मेगा लिलाव (IPL 2022 Auction) सुरू आहे. सनरायर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) माजी कर्णधार डेव्हिड वॉर्नरने आपली बेस प्राईस 2 कोटी रूपये ठेवली होती. गेल्या हंगामात हैदराबादने हंगामाच्या मध्यावर डेव्हिड वॉर्नरकडून कर्णधारपद काढून घेत ते केन विलियमसनकडे सोपले होते. त्यानंतर वॉर्नरला संघातूनही डच्चू मिळाला होता.

डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वात सनरायजर्स हैदराबादला 2016 मध्ये आयपीएल विजेतेपदाला (IPL Winner) गवसणी घातली होती. 2018 मध्येही डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वातच हैदराबादने फायनल गाठली होती. मात्र 2021 च्या हंगामात वॉर्नरच्या बॅटिंग फॉर्मवरून फ्रेंचायजीने आधी त्याचे कर्णधारपद काढून घेतले. त्यानंतर त्याला संघातूनही डच्चू मिळाला. या अपमानामुळे वॉर्नर रागावला होता.

मात्र आयपीएलमध्ये धावांचा दुष्काळ सहन करणाऱ्या वॉर्नरने आयपीएलनंतर झालेल्या टी 20 वर्ल्डकपमध्ये आणि नुकत्याच झालेल्या अॅशेस मालिकेत (Ashes Series) धावांची डोंगर रचत आपला फॉर्म सिद्ध केला होता. डेव्हिड वॉर्नरने आयपीएलमध्ये आतापर्यंत 150 सामन्यात 41.6 च्या सरासरीने 5449 धावा केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dushyant Chautala"...तर सरकार पाडण्यास मदत करू," माजी उपमुख्यमंत्र्याने काँग्रेसला पाठिंबा देत वाढवले भाजपचे टेन्शन

ईशान्य भारतीय चिनी, तर दक्षिणेतील लोक आफ्रिकन लोकांप्रमाणे दिसतात; सॅम पित्रोदांच्या वक्तव्याने वादाची शक्यता

नातीसाठी आजोबांनी 8 वर्षे दिला लढा, अखेर सामूहिक बलात्कार करणाऱ्या 4 गुन्हेगारांना 25 वर्षे तुरुंगवास

PM Modi: 'अदानी-अंबानींकडून किती संपत्ती गोळा केली, त्यांना शिव्या देणे का थांबवले?' पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला प्रश्न

Latest Marathi News Live Update : मतदान कमी झाल्याची चिंता नाही - अजित पवार

SCROLL FOR NEXT