Delhi Capitals Players ware Special T Shirt against Kolkata Knight Riders  esakal
IPL

दिल्ली KKR विरूद्धच्या सामन्यात 'खास' टी - शर्ट घालण्याचे खास कारण

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : आयपीएलच्या 41 व्या सामन्यात आज दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात सामना होत आहे. या सामन्यासाठी दिल्ली कॅपिटल्स एक खास टी-शर्ट (Special T-Shirt) घालणार आहे. विशेष म्हणजे दिल्ली हे टी-शर्ट लिलावात काढणार असून त्यातून निधी गोळा केला जाणार आहे.

दिल्लीच्या या मोहिमेअंतर्गत दिल्ली कॅपिटल्सच्या फॅन्सना त्यांच्या स्टार खेळाडूंनी सामन्यात घातलेला टी शर्ट घेण्याची संधी मिळणार आहे. या लिलावातून मिळणारा निधी हा चॅरिटीसाठी वापरण्यात येणार आहे. सामन्यात टाकलेला प्रत्येक चेंडू, घेतलेली प्रत्येक विकेट, केलेली प्रत्येक धाव चाहत्यांना त्यांच्या डीसी शर्टच्या जवळ घेऊन जाणार आहे. याचबरोबर लिलावातून मिळणारी रक्कम ही इन्सपायर्ड इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स विजयानगरसाठी (Inspire Institute of Sport Vijayanagar) वापरली जाणार आहे.

आयआयएस हा जेएसडब्लू ग्रुपचा एक उपक्रम आहे. या उपक्रमाअंतर्गत भारतातील पहिले खासगी क्रीडा केंद्र सुरू करण्यात आले आहे. यात ऑलिम्पिकमधील सर्व खेळातील खेळाडूंना उच्च दर्जाचा सराव करता यावा, देशातील गुणवान खेळाडूंना चांगले प्रशिक्षण मिळावे यासाठी काम केले जाणार आहे. आजच्या दिल्लीच्या सामन्यातून मिळणाऱ्या निधीचा वापर हा भारताच्या भविष्यातील स्टार ऑलिम्पियन खेळाडू घडवण्यासाठी होणार आहे.

या उपक्रमाबद्दल बोलताना सह संस्थापक तिजमेन झोंडेरविक सांगितले की, 'दिल्ली कॅपिटल्स सोबतची ही भागीदारी सुरू ठेवताना आम्हाला खूप आनंद होत आहे. आयआयएस हा भारतीय खेळाडूंसाठी एक चांगला उपक्रम आहे. हा जेएसडब्लूने सुरू केला आहे. याद्वारे देशाला उत्तम दर्जाचे खेळाडू लाभतील. या उपक्रमाशी जोडणे जाणे ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. यामुळे भारतात खेळाडू घडवणे आणि देशातील क्रीडा क्षेत्राचा विकास होणार आहे.

दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना सुरू होताच चाहते दिल्लीच्या खेळाडूंनी आजच्या सामन्यात घातलेल्या जर्सीवर बोली लावण्यास सुरूवात करू शकतात. चाहते ही बोली matchwornshirt.com/club/delhi-capitals वर लावू शकात. चाहते ही बोली 15 मे पर्यंत लावू शकतात. यानंतर सर्वोच्च बोली लावणाऱ्या चाहत्याला हा शर्ट दिला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivaji University News : कुणाचा फोटो, तर कुणाची नावं चुकली; शिवाजी विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रात ढिगभर चुका

स्वत:च्या आमदारांचा विरोध तरी ठाकरे बंधूच्या युतीनंतर पेढे वाटणाऱ्यांचा भाजप प्रवेश, मंत्री महाजनांसमोर राडा

Kolhapur Crime: गुलाल, भात, अन् टाचण्या टोचलेले लिंबू... कोल्हापुरात गाभण गायीचा दुर्दैवी मृत्यू; ग्रामस्थांमध्ये दहशत

Shivaji Maharaj Video: इतिहास जिवंत झाला! शिवराज्याभिषेकापासून रायगडच्या 3D मॅपिंगपर्यंत… 2025 मध्ये AI ने घडवलेले शिवरायांचे थरारक क्षण

Christmas Viral Video: ख्रिसमसची खास सुरुवात, मुंबई चर्चचा व्हिडिओ पाहिलात का?

SCROLL FOR NEXT