Faf du Plessis Virat Kohli Cheers For Mumbai Indians
Faf du Plessis Virat Kohli Cheers For Mumbai Indians  ESAKAL
IPL

VIDEO : फाफ ड्युप्लेसिसने दिल्या मुंबई... मुंबई...च्या घोषणा

अनिरुद्ध संकपाळ

मुंबई : रॉयल चॅलेंजर बेंगलोरने आयपीएल 2022 (IPL 2022) च्या लीग स्टेजमधील आपला अखरेचा सामना 8 गडी राखून जिंकला. या विजयाबरोबरच आरसीबी (RCB) गुणतालिकेत 16 गुणांसह चौथ्या स्थानावर पोहचली आहे. मात्र त्यांचे प्ले ऑफचे (Play Off) स्वप्न मुंबईच पूर्ण करू शकते. कारण जर दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) पराभव केला तर ते रनरेटच्या आधारे प्ले ऑफमध्ये दाखल होतील आणि आरसीबीला याचा फटका बसणार आहे.

दरम्यान, गुजरात टायटन्स विरूद्धच्या सामन्यात दमदार विजय मिळवल्यानंतर रॉयल चॅलेंजर बंगलोरचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि सध्याचा कर्णधार फाफ ड्युप्लेसिस ( Faf du Plessis) यांनी मुंबईला आपला जोरदार पाठिंबा दिला. विराट कोहली आणि फाफ ड्युप्लेसिसने गुजरातचे 169 धावांचे आव्हान पार करताना 115 धावांची सलामी दिली होती. विराट कोहली बॅड पॅचमधून बाहेर येत असल्याचे संकेत दिले. त्याने 54 चेंडूत 73 धावांची खेळी केली. तर फाफ ड्युप्लेसिसने 38 चेंडू 44 धावांची खेळी केली.

सामना झाल्यानंतर हे दोघेजण बोलत होते. त्यावेळी विराट कोहली आणि फाफ ड्युप्लेसिस यांनी आता ते शनिवारी होणाऱ्या मुंबई आणि दिल्ली सामन्यात मुंबईला सपोर्ट करणार आणि त्यांच्यासाठी चिअर करणार असे म्हणाले. मैदानावर मुंबई अणि आरसीबी यांच्यात कायम द्वंद्व रंगत असते. मात्र आता आरसीबी याच मुंबईच्या विजयासाठी त्यांना चिअर करणार आहे. दरम्यान, फाफ ड्युप्लेसिसने आतापासूनच मुंबई... मुंबई... असे ओरडायला सुरूवात केली आहे.

आरसीबीने यंदाच्या हंगामातील लीग स्टेजच्या 14 सामन्यापैकी 8 सामने जिंकले आहेत. त्यांचे सध्या 16 गुण झाले असून त्यांचे नेट रनरेट (Net Run Rate) -0.253 इतका आहे. दुसऱ्या बाजूला दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत 13 सामन्यातील 7 सामने जिंकून 14 गुण मिळवले आहेत. त्यांचे नेट रनरेट +0.255 इतके आहे. दिल्लीला जर प्ले ऑफमध्ये प्रवेश करायचा असेल तर त्यांना शनिवारी मुंबई इंडियन्सला पराभूत करावे लागेल. जर दिल्ली मुंबई विरूद्ध हरली तर आरसीबीचा प्ले ऑफचा मार्ग मोकळा होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : धोनी गोल्डन डक; जडेजामुळे चेन्नईने मारली 168 धावांपर्यंत मजल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

Job Discrimination : मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा, एचआरने मागितली माफी!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT